महाराष्ट्रात १८ ते ४४ वयापर्यंतच्या लोकांचे लसीकरण नाही

मुंबई : राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिकांना मोफत लसीकरणाचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे. मात्र इच्छा असूनही येत्या १ मेपासून लसीकरणास प्रारंभ होणार नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

नागरिकांनी घराबाहेर पडताना स्वयंशिस्त पाळावी : दापोली दौऱ्यात आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

दापोली : ‘करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन नागरिकांनी करणे आवश्यक आहे. लॉकडाउनच्या काळात गेले अनेक दिवस नागरिक घरामध्ये होते. परंतु घराबाहेर पडताना स्वयंशिस्त पाळावी,’ असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री राजेश टोपे यांनी केले. आज (२० नोव्हेंबर) दापोली उपजिल्हा रुग्णालयास त्यांनी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते.