अप्रसन्न करून पडद्याआड गेलेला दीक्षित

लांजा तालुक्यातल्या रावारी गावचा सुपुत्र आणि जवळचा मित्र प्रसन्न रामचंद्र दीक्षित अचानक या जगातून निघून गेला आहे. त्याला जवळचा तरी कसं म्हणावं? जवळचा असता तर त्याच्या वैयक्तिक कौटुंबिक जीवनात निर्माण झालेली एखादी अस्वस्थता त्याने बोलून दाखवली असती, पण त्याच्या तोंडून त्याबद्दल कधीही साधा उल्लेखही झाला नाही.