राजभवन देवी मंदिरात राज्यपालांनी केली आरती

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी (सात जुलै) राजभवन येथील प्राचीन देवी मंदिरात जाऊन देवीची आरती केली. या वेळी राज्यपालांनी नागरिकांचे सुख, समाधान व उत्तम आरोग्याकरिता प्रार्थना केली.

हे मंदिर प्राचीन असून, गेली अनेक वर्षे आषाढ महिन्यात या दिवशी या मंदिरात विशेष पूजा होते. यंदा मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर देवी मंदिरातील नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध आणण्यात आले होते. राजभवन येथील ही देली सागरमाता, साकळाई, तसेच श्री गुंडी या नावांनी ओळखली जाते.
……..

वेबसाइट पाहा : https://bit.ly/3ghEcLN व्हॉट्सअॅपवर संपर्कासाठी https://bit.ly/2NHmTr7 येथे क्लिक करा.

Leave a Reply