रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज १३ रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आल्याने, करोनावर मात केलेल्या रत्नागिरीतील रुग्णांची संख्या आता ५०७ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १८३ रुग्ण आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात काल (ता. ६) सायंकाळपासून ३१ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ७८१ झाली आहे. त्यापैकी ५०७ जण बरे झाले आहेत. आज कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण, रत्नागिरी येथून ७, जिल्हा कोव्हिड रुग्णालयातून ५ आणि कोव्हिड केअर सेंटर, पाचल येथून एक अशा १३ रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.
आज दाखल झालेल्या रुग्णांचा तपशील असा – जिल्हा कोव्हिड रुग्णालय – १२, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – ६, दापोली -१३. सायंकाळच्या स्थितीनुसार जिल्ह्यात ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २४६ आहे.
कोरोना अपडेट
आज रात्री उशिरा प्राप्त अहवाल.
25 नवे पॉझिटिव्ह रुग्ण
एकूण संख्या आता 806
आजचे पॉझिटिव्ह रुग्ण खालील प्रमाणे
रत्नागिरी 8
लांजा 4
राजापूर 4
मंडणगड 4
दापोली 5
याबाबतचे डिटेल्स उद्या दुपारपर्यंत कळवण्यात येतील.
ॲक्टिव्ह कन्टेनमेन्ट झोन
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या ५७ ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून, रत्नागिरी तालुक्यात १७ गावांमध्ये, दापोलीमध्ये नऊ गावांमध्ये, खेडमध्ये तीन गावांमध्ये, लांजा तालुक्यात सहा, चिपळूण तालुक्यात १७ गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात एक आणि राजापूर तालुक्यात चार गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
संस्थात्मक विलगीकरण
संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या रुग्णांची स्थिती पुढीलप्रमाणे – शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – ४४, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – एक, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – पाच, उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी – दोन, कोव्हिड केअर सेंटर, घरडा, लवेल – चार, ग्रामीण रुग्णालय गुहागर – दोन, केकेव्ही, दापोली – एक असे एकूण ५९ संशयित करोना रुग्ण दाखल आहेत.
होम क्वारंटाइन
मुंबईसह एमएमआर क्षेत्र, तसेच इतर जिल्ह्यांतून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाइन केले जाते. आजअखेर होम क्वारंटाइन खाली असणाऱ्यांची संख्या १६ हजार ७३२ इतकी आहे.
परराज्यातून व अन्य जिल्ह्यांतून रत्नागिरी जिल्ह्यात सहा जुलैअखेर एकूण एक लाख ६७ हजार ६५५ व्यक्ती दाखल झाल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून इतर राज्यांत, तसेच इतर जिल्ह्यांत गेलेल्यांची संख्या ९० हजार ४२८ आहे.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी दोन रुग्णांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २४५ झाली आहे. हे दोन रुग्ण कणकवली तालुक्यातील वाघेरी आणि ओझरम गावचे आहेत. जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या १८३ असून, सद्यस्थितीत जिल्ह्यात ५६ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
…….
