‘टिकटॉक प्रो’च्या खोट्या लिंकपासून सावध राहा!

मुंबई : केंद्र सरकारने टिकटॉक या अॅपवर बंदी घातली असली, तरीही या ॲपचे अनेक चाहते आहेत. त्याचा गैरफायदा घेण्यासाठी सायबर गुन्हेगार व समाजकंटकांकडून एक खोटी टिकटॉक प्रो लिंक बनवण्यात आली आहे. कोणीही अशा लिंकवर क्लिक करू नये, तसेच ती फॉरवर्डही करू नये, असे आवाहन महाराष्ट्र सायबर गुन्हे विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केले आहे.

माहितीचा गैरवापर करणाऱ्या, तसेच देशाच्या सुरक्षेला बाधक ठरू शकतील, अशा एकूण ५९ ॲप्सवर केंद्र सरकारने नुकतीच बंदी घातली असून, त्यात टिकटॉक या लोकप्रिय अॅपचाही समावेश आहे. परंतु त्याचे चाहते इंटरनेटवर आहेत. याचा फायदा घेण्यासाठी समाजकंटकांकडून फेक लिंक (खोटी) बनवण्यात आली असून, त्याचा प्रसार व्हॉट्सॲप मेसेजेस व एसएमएसवर केला जात आहे. त्यावर क्लिक केल्यास वापरकर्त्याची सर्व माहिती सायबर गुन्हेगारांकडे जाते. त्या मेसेजचा एक प्रकार सोबतच्या फोटोमध्ये दाखवला आहे.

त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही मेसेजच्या लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अशा लिंक्समध्ये मालवेअर असू शकते. त्यामुळे गोपनीय माहितीची चोरी होऊ शकते. त्यामुळे यापासून सावधानता बाळगावी, असे सांगण्यात आले आहे.
…..

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply