सलग नवव्या वर्षी दहावीच्या परीक्षेत कोकण विभाग अव्वल

रत्नागिरी : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत सलग नवव्या वर्षी कोकण विभागीय मंडळाचा निकाल राज्यात अव्वल ठरला. त्यातही सिंधुदुर्ग जिल्हा आणि त्यातही सिंधुदुर्गातील मुली राज्यात अव्वल ठरल्या आहेत.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश असलेल्या कोकण विभागीय मंडळाचा निकाल ९८.७७ टक्के लागला. करोनामुळे यावर्षी कोकण विभागीय मंडळाचे पत्रकार परिषद झाली नाही. मंडळातर्फे कोकण विभागीय सचिव देवीदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे निकाल जाहीर केला.

गेल्यावर्षी कोकण मंडळाचा निकाल ८८. ३८ टक्के तर यंदाचा निकाल ९८.७७ टक्के लागला असून गेल्या वर्षीपेक्षा निकालात १०.३९ टक्क्यांची वाढ झाली आहे.
परीक्षेला रत्नागिरी जिल्ह्यातून २२ हजार ५४७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी २२ हजार ५०६ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यातील २२ हजार २११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ११ हजार १८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ११ हजार १८० विद्यार्थी परीक्षेला बसले आणि ११ हजार ६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोकण मंडळात परीक्षेला बसलेल्या एकूण ३३ हजार ६८६ विद्यार्थ्यांपैकी ३३ हजार २७१ उत्तीर्ण झाले.
रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९८.४७ टक्के लागला असून त्यात मुलांचा ९८.२९ टक्के, तर मुलींचा निकाल ९९.१० टक्के आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९८.९३ टक्के असून मुलांचा ९८.६० टक्के, तर मुलींचा ९९.२८ टक्के लागला आहे. मुलींचा निकाल राज्यातील सर्वाधिक आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ४१४ शाळांसाठी ७३ परीक्षा केंद्रे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २२८ शाळांसाठी ४१ परीक्षा होती.

राज्यातील विविध विभागीय मंडळांच्या निकालाची टक्केवारी अशी – कोकण ९८.७७ पुणे ९७.३४, नागपूर ९३.८४, औरंगाबाद ९२, मुंबई ९६.७२, कोल्हापूर ९७.६४, अमरावती ९५.१४, नाशिक ९३.७,, लातूर ९३.९.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply