रत्नागिरी/सिंधुदुर्ग : आज (ता. २९) सायंकाळी मिळालेल्या अहवालानुसार रत्नागिरी जिल्ह्यात नवे ८५ करोनाबाधित रुग्ण आढळले असून एकूण बाधितांची संख्या एक हजार ७४६ झाली आहे. एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद गेल्या २४ तासांत झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याचार करोनाबाधितांची नोंद आज झाली आहे.
सायंकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात ३१ रुग्ण आढळले होते. रात्री पावणेदहा जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार आणखी ५४ रुग्ण जिल्ह्यात आढळले.
रत्नागिरी जिल्ह्यातून आज ३१ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार १३३ झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हिड रुग्णालयातील ११, कोव्हिड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली १, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी ७, कोव्हिड केअर सेंटर घरडा, खेड ६, कोव्हिड केअर सेंटर, देवधे, लांजा ६ आणि ॲन्टीजेन टेस्ट – १ रुग्ण आहे. आजच्या पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण असे – जिल्हा कोव्हिड रुग्णालय, रत्नागिरी – १८ रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – ४ रुग्ण, दापोली – ८ रुग्ण, ॲन्टीजेन टेस्ट – १ रुग्ण.
रात्रीच्या अहवालानुसार रत्नागिरीत २१, कामथे येथे ११, कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात १७, दापोलीत ३, तर रायपाटण आणि लांजा येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला.
उक्ताड (चिपळूण) येथील एका ८३ वर्षीय करोना रुग्णाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या आता ५८ झाली आहे. आतापर्यंतच्या तालुकानिहाय मृतांची आकडेवारी अशी – रत्नागिरी – १३, खेड – ६, गुहागर – २, दापोली – ११, चिपळूण – १२, संगमेश्वर – ७, लांजा – २, राजापूर – ४, मंडणगड – १.
आज सायंकाळची स्थिती अशी – एकूण बाधित – १६९२, बरे झालेले – ११३३, मृत्यू – ५८, एकूण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह – ५५५. आज विश्वनगर, रत्नागिरी, पठाणवाडी किल्ला, रत्नागिरी, भागीर्थी अपार्टमेंट, पऱ्याची आळी, रत्नागिरी, राज मेडिकल मागे,मारुती मंदिर, रत्नागिरी, गोल्डन पार्क, माळनाका, रत्नागिरी, रेल्वेस्टेशन, रत्नागिरी, महालक्ष्मी मंदिरसमोर, कारवांचीवाडी, रत्नागिरी, कापडी रेसिडेन्सी, खेडशी, रत्नागिरी, गणेशनगर, गोळप सडा, रत्नागिरी, खेडशी पूल, रत्नागिरी, महालक्ष्मी मंदिरामागे, खेडशी, रत्नागिरी,सड्ये पिरंदवणे, रत्नागिरी, टिके, रत्नागिरी, मिरकरवाडा, रत्नागिरी, गोळप सडा, रत्नागिरी, उसगाव, ता. संगमेश्वर ही क्षेत्रे करोना विषाणू बाधित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
जिल्ह्यात सध्या २११ ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात २५ गावांमध्ये, दापोलीमध्ये ११, खेडमध्ये ५९, लांजा तालुक्यात ७, चिपळूण तालुक्यात ९६ गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात १, गुहागर तालुक्यात १० आणि राजापूर तालुक्यात २ गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांमध्ये असलेल्या रुग्णांची स्थिती अशी – जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी – ६८, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – १५, कोव्हिड केअर सेंटर, पेढांबे ३, उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी – ३, कोव्हिड केअर सेंटर घरडा – २, ग्रामीण रुग्णालय, गुहागर – १, कोव्हिड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली – २३, कोव्हिड केअर सेंटर, लांजा – १ असे एकूण ११६ संशयित करोना रुग्ण दाखल आहेत.
मुंबईसह एम. एम. आर. क्षेत्र तसेच इतर जिल्ह्यांतून आल्याने होम क्वारंटाइन केलेल्या आजअखेरच्या चाकरमान्यांची संख्या २१ हजार २२७ आहे.
जिल्हा रुग्णालयामार्फत आतापर्यंत १७ हजार ११८ नमुने करोनासाठी तपासण्यात आले असून त्यापैकी १६ हजार ६२२ तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील १६९२ अहवाल पॉझिटिव्ह आले असून १४ हजार ९१८ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून ४९६ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. ते नमुने रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी चार व्यक्तींचे करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण २७० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यःस्थितीत जिल्ह्यात ७० रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली. जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ६ आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आलेले नमुने ३४६ असून विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या रुग्णांची संख्या १२० आहे.
रत्नागिरी जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालयात मानधनावर भरती
रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालय आणि महिला रुग्णालयात वर्ग ३ आणि वर्ग ४ संवर्गातील मानधनावर पदभरती करण्यात येणार आहे. स्वच्छतासेवेसाठी वर्ग ४संवर्गातील वॉर्डबॉय, स्वच्छता सेवेसाठी दररोज ४०० रुपये या दराने मानधनावर आणि वर्ग ३ संवर्गातील अधिपरिचारिका (जीएनएम) दरमहा २० हजार रुपये आणि एएनएमसाठी दरमहा १७ हजार रुपये यानुसार देण्यात येणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज समन्वयक, कोव्हिड-१९ कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, रत्नागिरी येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सकांनी केले आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media