Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरीत ४, तर सिंधुदुर्गात ९ नवे करोनाबाधित

Advertisements

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१५ नोव्हेंबर) चार नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर सहा जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज नवे नऊ रुग्ण आढळले, तर आठ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज सहा रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ८११३ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९४.४९ टक्के आहे. जिल्ह्यात आज आढळलेले चारही रुग्ण रत्नागिरीतील असून, त्यापैकी दोघे आरटीपीसीआर चाचणीनुसार, तर दोघे अँटिजेन टेस्टनुसार करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले.

जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८५८६ झाली आहे. बाधितांचा दर १४.४५ टक्के आहे. सध्या ८४ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. त्यापैकी २२ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात गेल्या चार दिवसांपासून करोनाचा एकही रुग्ण उपचारांखाली नाही.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. केवळ १६ वर्षांची ही तरुणी चिपळूणच्या शासकीय रुग्णालयात मरण पावली. त्यामुळे जिल्ह्यात करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता ३१९ झाली आहे. जिल्ह्याचा मृत्युदर किंचित वाढून तो ३.७१ टक्के झाला आहे.

मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – रत्नागिरी ८७, खेड ५१, गुहागर १२, दापोली ३२, चिपळूण ७६, संगमेश्वर ३३, लांजा ११, राजापूर १४, मंडणगड ३.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नऊ नव्या करोनाबाधितांची वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या ५०७० झाली आहे. सध्या १४० जण उपचारांखाली आहेत. आज करोनामुक्त झालेल्या आठ जणांसह जिल्ह्यातील एकूण करोनामुक्तांची संख्या ४७९३ आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १३१ जणांची करोनाविरुद्धची लढाई अयशस्वी झाली.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version