करोनाचे रत्नागिरीत ६, तर सिंधुदुर्गात १२ नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरीत आज (१ डिसेंबर) सहा नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर १८ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज १२ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर १४ जण करोनामुक्त झाले.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (१ डिसेंबर) करोनाचे नवे सहा रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८८१५ झाली आहे. आज तपासलेल्या अन्य २०९ जणांचे करोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बाधितांचा दर १३.८२ टक्के आहे.

आजच्या बाधितांचा तपशील असा – रॅपिड अँटिजेन टेस्ट – रत्नागिरी ४, दापोली १, संगमेश्वर १ (एकूण ६)

जिल्ह्यात आज १८ रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ८२९८ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९४.१३ टक्के आहे. सध्या १४९ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. त्यापैकी ४६ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. दापोलीतील ६५ वर्षीय महिलेचा आज सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात करोनामुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या ३२१ झाली आहे. जिल्ह्याचा मृत्युदर ३.६४ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१ डिसेंबर) १२ नव्या करोनाबाधितांची वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या ५२९७ झाली आहे. सध्या २२९ जण उपचारांखाली आहेत. आज १४ जण करोनामुक्त झाले असून, जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण करोनामुक्तांची संख्या ४९२४ आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १४४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply