Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

कोकण रेल्वेमार्गावर दोन नववर्ष विशेष गाड्या

Advertisements

नवी मुंबई : कोकण रेल्वेमार्गावर दोन नववर्ष विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. सीएसएमटी ते कन्याकुमारी आणि एलटीटी ते कन्याकुमारी या मार्गावर या गाड्या सोडल्या जाणार आहेत.

सीएसएमटी-कन्याकुमारी मार्गावर 01461 क्रमांकाची सुपरफास्ट विशेष गाडी ५ जानेवारी २०२३ रोजी दुपारी साडेतीन वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री सव्वाअकरा वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात 01462 क्रमांकाची गाडी ७ जानेवारी २०२३ रोजी दुपारी सव्वादोन वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी सीएसएमटीला पोहोचेल.

दुसरी एलटीटी ते कन्याकुमारी मार्गावरील 01463 क्रमांकाची सुपरफास्ट विशेष गाडी
गुरुवारी १२ आणि १९ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री सव्वाअकरा वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात 01464 क्रमांकाची गाडी १४ आणि २१ जानेवारीला कन्याकुमारी येथून दुपारी सव्वादोन वाजता पोहोचेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी एलटीटीला पोहोचेल.

या दोन्ही गाड्या कन्याकुमारीला जाताना कोकण आणि गोव्यातील स्थानकांवर पोहोचण्याच्या वेळा अशा – ठाणे – सायंकाळी ४.०५, पनवेल- ४.५०, रोहा- ६.५०, चिपळूण- रात्री ८.१०, रत्नागिरी – ९.५०, कणकवली- ११.३०, सिंधुदुर्ग- ११.५०, सावंतवाडी- मध्यरात्रीनंतर १२.२०, मडगाव- पहाटे २.
परतीच्या प्रवासातील वेळा अशा – मडगाव रविवारी सकाळी ८.५०, सावंतवाडी – १०.१०, सिंधुदुर्ग – १०.३२, कणकवली – १०.४६, रत्नागिरी – दुपारी १.००, चिपळूण – २५०, रोहा – सायंकाळी ७.१०, पनवेल – ८.२०, ठाणे ९.२०.

या गाड्यांचे आरक्षण सुरू झाले असल्याची माहिती कोकण रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version