Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

चिपळूण लोककला महोत्सवाच्या उद्घाटनाला अभिनेता ओंकार भोजने

Advertisements

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्राने ५ ते ८ फेब्रुवारीदरम्यान आयोजित केलेल्या पर्यटन लोककला सांस्कृतिक खाद्य महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला अभिनेता ओंकार भोजने याची खास उपस्थिती असणार आहे.

ओंकार भोजने याने लोकमान्य टिळक वाचन स्मारक मंदिराला भेट दिली. यावेळी त्याला आयोजकांच्यावतीने प्रकाश देशपांडे यांनी लोककला महोत्सवाचे निमंत्रण दिले. ते ओंकारने स्वीकारले आहे.

पुढील महिन्यात ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पर्यटन लोककला सांस्कृतिक खाद्य महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. श्री जुना कालभैरव मंदिर ट्रस्टअंतर्गत कै. बापू बाबाजी सागावकर मैदानात हा महोत्सव होणार आहे. उद्घाटन समारंभाला अभिनेता ओंकार भोजनेही उपस्थित राहणार आहे.

ओंकारची प्रमुख भूमिका असलेला सरला एक कोटी हा चित्रपट २० जानेवारीपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याला लोकमान्य वाचन मंदिरातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. या भेटीवेळी कवी अरुण इंगवले, प्रा. संतोष गोनबरे, विनायक ओक, सुनील कुलकर्णी, डॉ. साहील दाभोळकर, योगेश बांडागळे, प्रियदर्शनी मोहिते यांच्यासह संचालक व साहित्यप्रेमी उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version