चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्राने ५ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केलेल्या पर्यटन लोककला सांस्कृतिक कोकणी खाद्य महोत्सवातील स्टॉलसाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लोककलांबद्दल सर्वांना जिव्हाळा आणि आदर आहे. लोककला जिवंत ठेवण्याचे महत्त्वाचे काम लोककलावंतानी केले आहे. कोकणातल्या लोककला, पर्यटन, कोकणी खाद्यसंस्कृती यांची ओळख सर्वदूर व्हावी, यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणी खाद्य संस्कृतीची ओळख व्हावी, यासाठी महोत्सवात खाऊगल्ली उघडण्यात येणार आहे. कोकणातील शाकाहारी, मांसाहारी आणि मस्त्याहारी खाद्यपदार्थांची मेजवानी तेथे उपलब्ध असणार आहे.
पर्यटन लोककला सांस्कृतिक कोकणी खाद्य महोत्सवांतर्गत १० × १० फूट आकारचे २२ स्टॉल सशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी २५ जानेवारीपर्यंत नावनोंदणी करणाऱ्या इच्छुकांना स्टॉल उपलब्ध होणार आहेत. सोडत पद्धतीने स्टॉलचे वाटप २९ जानेवारी रोजी केले जाणार आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी विभागप्रमुख प्रकाश घायाळकर (९७६५८६८७२२) आणि सुनील खेडेकर (९४२०१५६७९७) यांच्याशी संपर्क साधावा.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड