रत्नागिरी ग्राहक पेठेच्या प्रदर्शनाची सांस्कृतिक कार्यक्रमाने सांगता

रत्नागिरी : रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे महिला दिन, गुढीपाडवा, नववर्ष स्वागतानिमित्त आयोजित उद्योगिनी आणि महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू प्रदर्शनाची सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात सांगता झाली.

या कार्यक्रमात विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्या अॅड. शबाना वस्ता, माजी नगरसेविका शिल्पा सुर्वे, दिशा साळवी आणि सामाजिक कार्यकर्त्या, ग्राहक पेठेच्या संचालिका प्राचीताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

शांतीनगर येथील बालाजी मंगल कार्यालयात भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाला महिलांची भरपूर गर्दी झाली होती. बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्यांचा सत्कार प्राची शिंदे आणि शकुंतला झोरे यांनी पुष्परोपटे देऊन केला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या अॅड. शबाना वस्ता यांनी प्राचीताई शिंदे यांचे विशेष कौतुक केले. गेली १७ वर्षे प्राचीताई महिला उद्योगिनी, बचत गटांना एकत्रित आणून व्यासपीठ देत आहेत, असे त्यांनी सांगितले. त्या एक चालती बोलती ऊर्जा आहे. त्यांनी महिला बचत गटांना साथ दिला आहे. प्रदर्शन खूप छान वाटले. सर्व उद्योगिनींचा उत्साह चांगला आहे, तो असाच टिकून राहू दे. या उत्साहातून आपली उज्ज्वल वाटचाल होऊ, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधा भट यांनी केले. प्रदर्शनादरम्यान महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. यात प्रश्नमंजूषा, स्पॉट गेम, फनी गेम्स, पाककला स्पर्धांचा समावेश होता. बक्षीस वितरण सोहळ्यानतर आंबेशेत, वायंगणकरवाडी येथील श्री साई सेवा महिला मंडळाने पालखी नृत्य सादर केले. यातील महिलांनी ढोल-ताशांच्या गजरात पालखी नृत्याचे सुमारे पंचवीस प्रकार सादर केले. हा कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी झाली होती. श्री साई सेवा महिला मंडळाचा सत्कार संचालिका प्राचीताई शिंदे यांनी केला.

स्पर्धांतील विजेत्यांची नावे अशी – पाककला स्पर्धा- गोड पदार्थ- कीर्ती मोडक, प्रांजल कदम, तिखट पदार्थ- प्रज्ञा फडके, राधा पाथरे, कीर्ती मोडक, शरयू मोघे. संगीत खुर्ची- अनघा पाटील, अमिता घाटगे, नेत्रा साळवी, डोळे बांधून डबा फोडणे- प्रांजल कदम, टिकल्या चिकटवणे- संध्या नाईक, दुर्वा सावंत. रस्सीखेच- प्रथम क्रमांक – सिद्धी मलुष्टे, वैभवी साळवी, सुप्रिया गुरव, सोनाली शिंदे, नीलिमा सुर्वे, योगिता बेलवलकर, पायल गांधी, स्वाती रामाणे. द्वितीय क्रमांक- नेत्रा साळवी, अमिता घाडगे, आदिती कलये, रचना वेतोसकर, जान्हवी भुरवणे, अस्मी चव्हाण, धनश्री करमरकर, अश्विनी शेलार. ग्रुप गेम- कीर्ती मोडक, आकांक्षा कीर, तीर्था पेडणेकर.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply