सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल जाहीर

संचिता पाटील, अनुश्री राणे, अक्षता गुंजाळ विजेते

तळेरे (ता. कणकवली) : येथील अक्षरोत्सव परिवार आणि श्रावणी कॉम्प्युटर एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त आयोजित केलेल्या हस्ताक्षर स्पर्धेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उत्स्फ़ूर्त प्रतिसाद मिळाला. तिन्ही गटात मिळून ४०९ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेत पहिल्या गटात संचिता संभाजी पाटील, दुसऱ्या गटात अनुश्री अभिजित राणे, तर तिसऱ्या गटात अक्षता मारुती गुंजाळ यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

शालेय मुलांमध्ये लेखनाची आवड निर्माण व्हावी आणि मानवाला उपजत मिळालेली लेखनशैली भविष्यात कार्यरत राहावी, ती अधिकाधिक विकसित व्हावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. दोन वर्षांच्या यशस्वी आयोजनानंतर तिसऱ्या वर्षीही या स्पर्धेला जिल्ह्यातून उत्स्फ़ूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धा पहिली ते चौथी, पाचवी ते आठवी आणि नववी ते बारावी अशा तीन गटांत घेण्यात आली. या प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र तसेच उत्तेजनार्थ विजेत्या स्पर्धकांना सन्मानपत्र देऊन विशेष कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे.

या स्पर्धेचे परीक्षण सुलेखनकार अभिजित राणे आणि सुलेखनकार युवराज पचकर यांनी केले. यावर्षी सुप्रसिद्ध कवी प्रदीप पाटील यांच्या सामाजिक आशयावरील कविता लेखनासाठी देण्यात आल्या होत्या.
स्पर्धेचा गटनिहाय गुणानुक्रमे निकाल असा :
गट पहिला (पहिली ते चौथी) : संचिता संभाजी पाटील (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ओटव ओटववाडी), शिवन्या युवराज पचकर (विद्यामंदिर लोरे-मोगरवाडी), रिया शिवाजी आग्रे (विद्यामंदिर लोरे-मोगरवाडी), स्वरा अनिल ओतारी (श्री सातेरी जिल्हा परिषद केंद्रशाळा साटेली-भेडशी), दीपेश सुनील विटेकर (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वजराट देवसू, ता. वेंगुर्ले), सुकन्या अनिल नराम (विद्यामंदिर लोरे-मोगरवाडी).

गट दुसरा (पाचवी ते आठवी) : अनुश्री अभिजित राणे (एस. एम. हायस्कूल, कणकवली), रुद्र लक्ष्मण शेटे (विद्यामंदिर गडमठ क्र. १) लक्ष्मण नारायण सावंत (श्री माऊली विद्यामंदिर डोंगरपाल, ता. सावंतवाडी), समर्थ चंद्रकांत शिरसाट (शिवडाव माध्यमिक विद्यालय), संकेत मिलिंद गावकर (शिवडाव माध्यमिक विद्यालय, शिवडाव), श्रेया प्रवीण कदम (एस. एम. हायस्कूल, कणकवली).

गट तिसरा (नववी ते बारावी) : अक्षता मारुती गुंजाळ (कुडाळ हायस्कूल आणि ज्यु. कॉलेज), तनया प्रवीण कदम (एस. एम. हायस्कूल, कणकवली), प्रभाती आनंद देवळी (राजमाता सत्त्वशीलादेवी भोसले कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी), ऋतुजा रवींद्र परब (शिवडाव माध्यमिक विद्यालय, शिवडाव), वैष्णवी महेश कुणकेरकर (श्री. एम. एम. सावंत ज्यु. कॉलेज ऑफ आर्टस ॲण्ड कॉमर्स, कनेडी), ओंकार संजय सदडेकर (शिवडाव माध्यमिक विद्यालय, शिवडाव)

स्पर्धेचे बक्षीस वितरण तळेरे येथे होणार असून त्याबाबत विजेत्या स्पर्धकांना कळविण्यात येईल. त्यावेळी विजेते स्पर्धक आणि काही निवडक स्पर्धकांच्या हस्ताक्षरातील कवितांचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. गेल्यावर्षी ज्या विजेत्यांनी आपली पारितोषिके नेलेली नसतील, त्यांनाही ती वितरित करण्यात येणार असून अशा स्पर्धकांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अक्षरोत्सव परिवाराचे प्रमुख निकेत पावसकर, श्रावणी कॉम्प्युटर एज्युकेशन्सचे संचालक सतीश मदभावे व श्रावणी मदभावे यांनी स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांचे आभार आणि विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply