अ. भा. दैवज्ञ समाजोन्नती परिषदेच्या युवाप्रमुखपदी विशाल कडणे

तळेरे (कणकवली) : तळेरे गावचे सुपुत्र, गृहनिर्माण चळवळीतील युवा नेतृत्व आणि मुंबई हाउसिंग फेडरेशनचे संचालक डॉ. विशाल विजय कडणे यांची अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेच्या युवाप्रमुखपदी एकमताने निवड करण्यात आली.

अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेच्या युवाप्रमुखपदी विशाल विजय कडणे यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या आईवडिलांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

दोन वेळा वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव झळकलेले उच्चशिक्षित डॉक्टरेट इंजिनिअर, सामाजिक कार्यकर्ते, ईशान्य मुंबई दैवज्ञ ट्रस्टचे सर्वेसर्वा आणि दैवज्ञ चषक समन्वयक समितीचे संस्थापक विशाल कडणे विविध माध्यमातून सुप्रसिद्ध उद्योजक आनंद पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षे दैवज्ञ चषक, दैवज्ञ गरबा, मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, मोफत अन्नधान्य वाटप इत्यादी उपक्रम यशस्वीपणे आयोजित करत आहेत. अनेक उपक्रमांतून समाजश्रेष्ठी स्व. जगन्नाथभाई पेडणेकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचे कार्य विशाल कडणे आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून करत असतात. हे करत असताना त्यांना सर्वश्री वैभव भुर्के, सुशांत रत्नपारखे, नितीन भुर्के, गौरव पोतदार, प्रथमेश (राज) बेळलेकर, सिद्धेश बेळलेकर, सौरभ नागवेकर, वेदांत मालणकर, समीर वेदक, अभिजित धोत्रे, प्रशांत शेट, विकास मसुरकर इत्यादी समाजबांधवांचे सहकार्य सातत्याने लाभत असते.

विशाल कडणे यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेच्या युवाप्रमुखपदी निवड झाली आ हे. आपल्या निवडीबद्दल श्री. कडणे यांनी समाजश्रेष्ठी डॉ. गजानन रत्नपारखी, डॉ. आनंद पेडणेकर, सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर आणि अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

युवाप्रमुखपदी नेमणूक झाल्याने वाढलेल्या जाबदारीचे भान लक्षात घेता अजून जोमाने समाजश्रेष्ठी स्व. जगन्नाथ भाई पेडणेकर यांचे विचार पुढे नेत समाजातील सर्व युवा ज्ञाती बंधूभगिनींना मातृसंस्थेच्या छत्राखाली एकत्र आणण्याचा मानस असल्याचे विशाल कडणे यांनी सांगितले.
(वृत्त आणि छायाचित्र – निकेत पावसकर, तळेरे)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply