रत्नागिरीच्या कऱ्हाडे ब्राह्मण संघात बुधवारी अभंगवाणी

रत्नागिरी : येथील कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच बुधवारी (दि. २८ जून) अभंगवाणी हा कार्यक्रम सादर होणार आहे.

कऱ्हाडे ब्राह्मण संघ आणि रत्नागिरीमधील संगीतप्रेमी कलाकारांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमात रत्नागिरीतील सुप्रसिद्ध गायक आनंद पाटणकर, श्वेता जोगळेकर, संध्या सुर्वे, करुणा पटवर्धन, तन्वी मोरे आणि अभिजित भट आपली कला सादर करणार असून त्यांना
विलास हर्षे, हेरंब जोगळेकर, विजय रानडे, मंगेश मोरे, मंगेश चव्हाण, केदार लिंगायत, चैतन्य पटवर्धन, श्रीरंग जोगळेकर, पांडुरंग बर्वे, उदय गोखले हे साथसंगत करणार आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू जोशी करणार असून एस. कुमार साउंड सिस्टीमचे उदयराज सावंत ध्वनिसंयोजन करणार आहेत.

हा कार्यक्रम २८ जून रोजी सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेत होणार असून रसिकांना तो विनामूल्य प्रवेश आहे. रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक हेरंब जोगळेकर आणि कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply