रत्नागिरीतील पहिले ईझी ऑडिओ हिअरिंग क्लिनिक इन्फिगोमध्ये सुरू

रत्नागिरी : ऐकण्याबाबतची समस्या नेमकी काय आहे, याचा अभ्यास करून त्यानुसार उपचार करण्यासाठी तळकोकणातील पहिले ईझी ऑडिओ हिअरिंग क्लिनिक हे अद्ययावत ऑडिओलॉजी सेंटर रत्नागिरीत इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये सुरू झाले आहे.

या केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी केले. यावेळी ते म्हणाले, ऑडिओलॉजी या शास्त्राचे तपासणी केंद्र रत्नागिरी प्रथमच सुरू होत आहे. त्यासाठी इन्फिगो आय केअर हॉस्पिटलने उचललेले पाऊल लोकोपयोगी आहे. आजवर बघण्याची काळजी घेताना यापुढे ऐकण्याचीही काळजी या हॉस्पिटलमध्ये घेतली जाणार आहे. अनुजा धनंजय कुलकर्णी यांच्या माध्यमातून सुरू झालेल्या या श्रवण सेवा केंद्राचा लाभ जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी घ्यावा.

यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, इन्फिगोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर उपस्थित होते.

प्रास्ताविकात डॉ. ठाकूर यांनी सांगितले की, ऑडिओलॉजी हे स्वतंत्र शास्त्र आहे. जसे डोळ्यांच्या आजाराकडे लोक दुर्लक्ष करतात, तसेच कानाबाबतही कमी ऐकू येणे यासारख्या समस्या टोकाला गेल्यानंतरच त्यावरील उपचाराची गरज लोकांना वाटते. अशा उपचारांसाठी मोठ्या शहरात जाणे अधिक खर्चीक असल्याने रुग्णांचा जुजबी उपचार करण्यावर भर असतो. लोकांना नीट बघता यावे म्हणून सुरू झालेल्या हॉस्पिटलने आता लोकांना नीट ऐकता यावे, यासाठी हे नवे दालन सुरू केले आहे. सर्व प्रकारच्या ऑडिओलॉजिक चाचण्या, मूल्यमापन, विविध कमी ऐकून येण्याच्या समस्यांवर उपाय करण्यासाठी हे केंद्र पूर्णपणे सुसज्ज आहे. ही सेवा इन्फिगोच्या रत्नागिरीसह खेड आणि लांजा येथील हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणार आहे.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कन्या अनुजा कुलकर्णी

ऑडिओलॉजिस्ट असलेल्या अनुजा धनंजय कुलकर्णी या रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कन्या आहेत. त्यांनी परदेशी न जाता आपल्याच देशात, गावात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करून सहाय्यक कर्मचाऱ्यांची तज्ज्ञ टीम रत्नागिरी जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. केवळ व्यवसायाचे नाही तर सेवेचे नवीन दालन उभे करून दिल्याचा अभिमान असल्याचे मत इन्फिगो आय केअरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी व्यक्त केले.

……………….

ऐकण्याची समस्या आहे? मग आमचं जरा ऐकाच!

ऐकण्याबाबतची समस्या नेमकी काय आहे, याचा अभ्यास करून त्यानुसार उपचार करण्यासाठी तळकोकणातील पहिले ईझी ऑडिओ हिअरिंग क्लिनिक हे अद्ययावत ऑडिओलॉजी सेंटर रत्नागिरीत इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये सुरू झाले आहे.

कमी ऐकू येणे किंवा त्याबाबतच्या समस्यांवर सर्वसामान्य माणसे फारशी गंभीर नसतात. कुणीतरी सांगतो म्हणून, इंटरनेटवरून अर्धवट माहिती घेऊन ऐकू येण्याचे यंत्रही अनेकजण घेतात आणि वापरतात. पण हे इतके सोपे नसते. ऐकण्याबाबतची समस्या नेमकी काय आहे, याचा अभ्यास करुन त्यानुसार उपचार करण्यासाठीच ऑडिओलॉजी हे स्वतंत्र शास्त्र आहे, ज्याचे कोणतेही तपासणी केंद्र कोकणात नाही. ही समस्या दूर करण्यासाठी इन्फिगो आय केअर हॉस्पिटलने पहिले पाऊल उचलले आहे. तुमच्या ‘बघण्या’ची काळजी घेतानाच आता ‘इन्फिगो’मध्ये तुमच्या ‘ऐकण्या’चीही काळजी घेतली जाणार आहे. रत्नागिरीच्या इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये २० ऑगस्ट २०२३ पासून आपल्या सेवेत रुजू झालेले कोकणातील पहिले ऑडिओलॉजी केंद्र अर्थातच श्रवणसेवा केंद्र.

पैशापेक्षा रुग्णांच्या समाधानाचे उत्पन्न जास्त मोलाचे हीच भावना मनात ठेवून ‘इन्फिगो’ने रत्नागिरीमध्ये आय केअर हॉस्पिटल सुरू केले. जिल्हा अंतराच्या दृष्टीने विखुरलेला आहे. त्यामुळे रुग्णांना रत्नागिरीपर्यंत येण्याजाण्याकरिता अधिक वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो, हे लक्षात घेत ‘इन्फिगो’ने लांजा आणि खेड या दोन ठिकाणीही आपली सेवा तेवढ्याच दर्जेदार पद्धतीने सुरू केली.

जसे डोळ्यांच्या आजारांकडे लोक दुर्लक्ष करतात, तसेच कानांबाबतही. ऐकू न येणे, कमी ऐकू येणे यासारख्या समस्या टोकाला गेल्यानंतरच त्यावरील उपचाराची गरज लोकांना वाटते. अशा उपचारांसाठी परजिल्ह्यात जाणे अधिक खर्चीक असल्याने जुजबी उपचार करण्यावर भर असतो. लोकांना नीट बघता यावे म्हणून सुरू झालेल्या ‘इन्फिगो’ने आता लोकांनी नीट ‘ऐकता’ यावे, यासाठी हे नवे दालन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

रत्नागिरीतील हे नवीन ऑडिओलॉजी क्लिनिक सर्व प्रकारच्या ऑडिओलॉजी चाचण्या, मूल्यमापन तसेच कमी ऐकू येण्याच्या विविध समस्यांवर उपाय करण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे.

ऐकण्याच्या समस्या असणाऱ्या सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी अचूक आणि तपशिलवार सेवा देण्यासाठी इन्फिगोमधील तज्ज्ञ ऑडिओलॉजिस्टची टीम समर्थ आहे. तसेच नवजात अर्भक आणि बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी समुपदेशन, हाही त्यातील महत्त्वाचा उपक्रम आहे.

ऑडिओलॉजिस्ट आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची टीम कोकणात उपलब्ध करून देताना व्यवसायाचे नाही, तर सेवेचे नवे दालन सुरू केल्याचा अभिमान ‘इन्फिगो’चे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर श्रीधर ठाकूर व्यक्त करतात. ते सांगतात, ‘‘आम्ही डोळ्यांसाठी बरीच अद्ययावत तंत्र (टेक्नॉलॉजी) आणि आधुनिक यंत्र (मॉडर्न मशीन्स) या भागात सर्वप्रथम आणली. त्याचप्रकारे अत्याधुनिक तंत्र असलेली उच्च दर्जाची ऑडिओलॉजी केअर मशिन्स आणि पुनर्वसन सेवा प्रदान करणे हे आमचे ध्येय आहे. एकदा ऐकण्याची समस्या चालू झाली की जगणे सुरळित होईपर्यंत एक छोटा प्रवासच असतो. या श्रवण आरोग्य प्रवासात मार्गदर्शन करायला आम्ही वचनबद्ध आहोत. श्रवणाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्यांवर प्रभावी निदान देऊन, उपचार वाढविणे आणि भविष्यातील गुंतागुंत रोखणे हे

इन्फिगोचे उद्दिष्ट आहे. येथे सर्व प्रकारची श्रवण यंत्रे माफक दरात उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

सामान्यतः लोकांना ऐकण्याच्या समस्येबद्दल किंवा आपल्याला पूर्वीसारखे ऐकू येऊ शकते याबद्दल फारसे माहीत नसते. तुमच्या ऐकण्यातील समस्या ऐकण्यासाठी आणि त्या दूर करण्यासाठी श्रवणशक्तीच्या आरोग्यासाठी इन्फिगोचे ऑडिओलॉजी सेंटर अद्ययावत तंत्रज्ञान घेऊन सज्ज आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply