नवनिर्माण हायचा क्रिश सिंग संरक्षण प्रबोधिनीच्या परीक्षेत उत्तीर्ण

रत्नागिरी : येथील नवनिर्माण हायचा बारावीताल विद्यार्थी क्रिश सिंग राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (नॅशनल डिफेन्स अकादमी) परीक्षेत लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची (NDA नॅशनल डिफेन्स अकादमी) परीक्षा भारतीय सैन्य दल, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल या भारतीय सशस्त्र दलांसाठी उमेदवारांची भरती करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित एक स्पर्धात्मक परीक्षा आहे. ही परीक्षा वर्षातून दोनदा साधारणतः एप्रिल आणि सप्टेंबर महिन्यात घेतली जाते. चालू शैक्षणिक वर्षात नुकत्याच झालेल्या या परीक्षेत नवनिर्माण हायचा बारावीचा विद्यार्थी क्रिश सिंग उत्तीर्ण झाला आहे. परीक्षेला देशभरातून ३ लाख ६० हजार विद्यार्थी बसले होते. त्यातून ७ हजार ७०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये क्रिश सिंगचा समावेश आहे.

या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना एसएसबी मुलाखतीकरिता बोलावले जाते. लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या निकालावर एकत्रितपणे उमेदवारांची अंतिम निवड आधारित असते.

लेखी परीक्षेत यश मिळवविणाऱ्या क्रिश सिंगचे अभिनंदन नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये, संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, मुख्याध्यापिका सौ. नजमा मुजावर आणि शिक्षकांनी केले आहे.Follow Kokan Media on Social Media

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply