रत्नागिरी : आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगणाऱ्यांचा भाजपातर्फे रत्नागिरीत सत्कार करण्यात आला.
भारताच्या इतिहासात २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने आणीबाणी जाहीर केली. मिसा कायद्याखाली अनेक निरपराध नागरिकांना २१ महिने कारागृहात डांबून ठेवण्यात आले. त्यामध्ये रत्नागिरी शहरातील अनेक जणांना तुरुंगवास भोगावा लागला. यातील काही व्यक्तींचा सत्कार रत्नागिरी शहर भाजपातर्फे करण्यात आला.
रत्नागिरीतील सुभाष राणे, श्री. सुर्वे, श्रीकांत मुकादम, अॅड. बाबासाहेब परुळेकर, विवेक भावे, डॉ. संजय केतकर यांनीही कारावास भोगला. आणीबाणी जाहीर झाल्याच्या दिवसाचे पन्नासावे वर्षे सुरू झाले आहे. त्यानिमित्त रत्नागिरी शहर भाजपातर्फे या सर्वांच्या घरी जाऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. जिल्हा संयोजक प्रशांत डिंगणकर, रत्नागिरी शहर संयोजक संदीप रसाळ, शहराध्यक्ष राजन फाळके, शहर सरचिटणीस राजन पटवर्धन, जिल्हा चिटणीस दादा ढेकणे, वर्षा ढेकणे, सौ. सत्यवती बोरकर यांनी गुलाबपुष्प देऊन या व्यक्तींना सन्मानित केले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड







