मोदी @ ९ या उपक्रमांतर्गत रत्नागिरीत भाजपातर्फे ज्येष्ठांचा सन्मान

दुचाकी फेरीलाही चांगला प्रतिसाद

रत्नागिरी : भाजपाच्या मोदी @ ९ या उपक्रमांतर्गत रत्नागिरी शहरातील ज्येष्ठांचा सन्मान आज करण्यात आला. सायंकाळी शहरातून काढण्यात आलेल्या दुचाकी फेरीलाही चांगला प्रतिसाद मिळाला.

भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, माजी आमदार बाळ माने आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजपाच्या जिल्हा संपर्क कार्यालयात हा कार्यक्रम झाला.

यावेळी ॲड. पटवर्धन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे सक्षम नेतृत्व देशाला लाभले आहे. पूर्वी कार्यकर्त्यांनी हालअपेष्टा सहन केल्या आणि आज हे यश मिळाले आहे. त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान केलाच पाहिजे. त्याच वेळी या कार्यकर्त्यांचे योगदान नव्या कार्यकर्त्यांना कळले पाहिजे. त्यांच्याशी समन्वय साधून पुन्हा २०२४ मध्ये भाजपाला निवडून द्यायचे आहे, याकरिता हा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. त्यातून भाजपाला अपेक्षित परिणाम साधता येऊ शकेल. २०२४ मध्ये भाजपचे खासदार मोठ्या प्रमाणात वाढतील. गेल्या ९ वर्षांत भाजपा सरकारच्या योजनांची माहिती, बदल लोकांना सांगण्याकरिता सज्ज राहण्याचे आवाहन मोदींनी केले आहे. भाजपाचे काम हायटेक झाले आहे. सातत्याने नवनवीन उपक्रम, कार्यक्रम राबवले जात आहेत.

प्रदेश सदस्य ॲड. बाबा परुळेकर, जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर, विजय पेडणेकर, शहराध्यक्ष अण्णा करमरकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्रम जैन आदींसह जिल्हा, शहर, तालुक्याचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी श्रीनिवास दळवी, श्रीकृष्ण खेर, मंदार सरपोतदार, सौ. दाक्षायणी बोपर्डीकर, नीताताई दाते, शंकर खेर, सुहास बाम, अशोक अभ्यंकर, माधव देवस्थळी, विजय आचरेकर, भालचंद्र हळबे, श्रीकांत जोशी, नूरमहम्मद सुवर्णदुर्गकर, मुन्नाशेठ सुर्वे, लीलाधर जोशी, रवींद्र मांडवकर, सत्यवती बोरकर, श्रीकांत ढालकर, जैनू सुवर्णदुर्गकर, प्रदीप फडके, अविनाश मुकादम, शेखर लेले, दत्तात्रय जोशी, अनंत मराठे, उदय गोवळकर, सौ. आणि श्री. कैलास विलणकर यांचा सन्मान करण्यात आला.

दुचाकी फेरीतून भाजपचे शक्तिप्रदर्शन

मोदी @ ९ उपक्रमांतर्गत रत्नागिरीत आज सायंकाळी भाजपने काढलेल्या दुचाकी फेरीला चांगला प्रतिसाद मिळाला. केंद्रातील भाजप सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मोदी @ ९ या देशव्यापी उपक्रमाअंतर्गत रत्नागिरी भाजपातर्फे आज शहरात मोठे शक्तिप्रदर्शन करत दुचाकी फेरी काढण्यात आली. यामध्ये भाजपचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले. मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून फेरीला सुरवात झाली. भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन आणि माजी आमदार बाळासाहेब माने यांच्यासमवेत भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते फेरीत उत्साहाने सहभागी झाले.

फेरीतील दुचाकीवर भाजपचे झेंडे फडकत होते, तर कार्यकर्त्यांनी भाजपाचे भगवे गमचे गळ्यात घातले होते. यामुळे वातावरण भगवे झाले होते. या फेरीमध्ये तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, सरचिटणीस उमेश कुळकर्णी, ओंकार फडके, शहराध्यक्ष अण्णा करमरकर, शहर सरचिटणीस बाबू सुर्वे, राजेंद्र पटवर्धन, जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर, राजेश सावंत, माजी नगरसेवक राजू तोडणकर, समीर तिवरेकर, प्रमोद खेडेकर, दादा ढेकणे, प्रशांत डिंगणकर, प्रवीण देसाई, शैलेश बेर्डे, राजन फाळके, विजय सालीम, संजय पाथरे, श्रीकांत मांडवकर, महिला यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply