रत्नागिरी : केंद्रातील भाजपा सरकारच्या नऊ वर्षांच्या काळातील कामांची माहिती घराघरापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने मोदी @नाइन अभियान राबविण्यात येणार असून त्याकरिता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली.
आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर भाजपाने लक्ष्य केंद्रित केले आहे. या अनुषंगाने मोदी ॲट नाइन अभियान देशभरात सुरू झाले आहे. हे अभियान ३० मेपासून सुरू झाले असू ते ३० जूनपर्यंत चालणार आहे. या महिनाभरात केंद्र सरकारच्या योजना तळागाळात पोहोचवल्या जाणार आहेत. त्याकरिता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्या अशा – रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा संयोजक म्हणून मंत्री नारायण राणे यांची आणि सहसंयोजक म्हणून प्रमोद जठार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विकासतीर्थ संयोजक- डॉ. नीलेश राणे, सहसंयोजक सच्चिदानंद ऊर्फ संजू परब, सचिन वहाळकर, सोशल मीडिया संयोजक- आमदार नीतेश राणे, उमेश कुळकर्णी, धनंजय पाथरे, अभियान प्रारंभ रॅली, व्हिडिओ कॉन्फरन्स संयोजक- राजन तेली, सहसंयोजक – अनिल ऊर्फ बंड्या सावंत, जाहीर सभा संयोजक – प्रमोद जठार, सहसंयोजक – प्रभाकर सावंत, बुद्धिवंत संमेलन संयोजक – ॲड. दीपक पटवर्धन, सहसंयोजक – मिलिंद कुलकर्णी, ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलन संयोजक- अजित गोगटे, सहसंयोजक- ॲड. बाबा परुळेकर, नीलेश तेंडुलकर, संयुक्त मोर्चा संमेलन संयोजक- संध्या तेरसे, सहसंयोजक- राजश्री विश्वासराव, व्यापारी संमेलन संयोजक- महेश सारंग, सहसंयोजक – सुशांत ऊर्फ मुन्ना चवंडे, निशिकांत भोजने.
लाभार्थी संमेलन संयोजक – अतुल काळसेकर, सहसंयोजक – मनोज रावराणे, रणजित देसाई, रवींद्र मडगावकर, विजय चितळे, प्रमोद अधटराव, मुन्ना खामकर. योग दिन कार्यक्रम संयोजक – लखमराजे भोसले, सहसंयोजक – अमित केतकर, घरोघरी संपर्क अभियान संयोजक – बाळ माने, सहसंयोजक – प्रसन्ना तथा बाळू देसाई, संपर्कातून समर्थन संयोजक- प्रमोद रावराणे, सहसंयोजक सतीश शेवडे.
रत्नागिरी तालुका कार्यकारिणी
मोदी @9 ची रत्नागिरी तालुका कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली आहे. अभियानाच्या अंमलबजावणीसाठी रत्नागिरी शहर आणि तालुका भाजपची बैठक आज भाजपा जिल्हा कार्यालयात झाली. याप्रसंगी सहसंयोजक प्रमोद जठार यांच्यासमवेत भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, ॲड. बाबा परुळेकर, सचिन वहाळकर, माजी आमदार बाळ माने, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, सरचिटणीस उमेश कुळकर्णी, शहराध्यक्ष सचिन करमरकर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विजय मिळवायच्या उद्दिष्टाने आणि केंद्राच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, असे ॲड. पटवर्धन यांनी प्रास्ताविकात सांगितले. सर्व विधानसभा मतदारसंघातही भाजपचे उमेदवार विजयी व्हावेत, यासाठी व्यूहरचना करण्यात येत आहे. देशात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे डबल इंजिनद्वारे विकास योजना राबवल्या जात आहेत. कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाचे चीज झाले पाहिजे, असेही ते म्हणाले. माजी आमदार बाळ माने, सहसंयोजक प्रमोद जठार यांच्यासह एकत्रित काम केल्यामुळे यश मिळेल, असेही ते म्हणाले. विधानसभा संयोजक विजय सालीम यांनीही तालुक्यात कानाकोपऱ्यात भाजपाची ताकद वाढत असल्याचे सांगितले. उमेश कुळकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी संयोजक सचिन वहाळकर यांनी विस्तृत कार्यकारिणी जाहीर केली. ती अशी- विशाल रॅली संयोजक- सचिन करमरकर, सहसंयोजक अमर रहाटे, ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलन संयोजक विजय बेहेरे, सहसंयोजक राजन फाळके, बुद्धिवंतांचे संमेलन संयोजक राजन पटवर्धन, सहसंयोजक सुजय लेले, व्यापार संमेलन संयोजक- जयप्रकाश पाखरे, सहसंयोजक दादा ढेकणे, लाभार्थी संमेलन संयोजक श्रीकांत मांडवकर, सहसंयोजक सौ. पल्लवी पाटील, संयुक्त मोर्चा संमेलन संयोजक लीलाधर भडकमकर, सहसंयोजक संदीप रसाळ, बूथस्तरीय संमेलन संयोजक संदीप सुर्वे, सहसंयोजक मुकेश भावे, विकासतीर्थ संयोजक मुकुंद जोशी, सहसंयोजक अनंत जाधव, योग दिवस संयोजक ओंकार फडके, सहसंयोजक सौ. सोनाली आंबेरकर, घरोघरी संपर्क संयोजक- भाई जठार, सहसंयोजक प्रशांत डिंगणकर, सोशल मीडिया संयोजक ॲड. नीलेश आखाडे, सहसंयोजक प्रवीण देसाई, संपर्कातून समर्थन संयोजक बाळशेठ जोग, सहसंयोजक राजू भाटलेकर. प्रभागप्रमुख- नितीन जाधव, रत्नाकर जोशी, उमेश कुळकर्णी, रफिक मुकादम, शैलेंद्र बेर्डे, सौ. प्राजक्ता रुमडे, प्रमोद खेडेकर, अमेय मसुरकर, राजू तोडणकर, शंकर शिंदे, मुन्ना मयेकर, मन्सूर मुकादम, सौ. संपदा तळेकर, केदार बोरकर, रामा शेलटकर.
रत्नागिरी विधानसभा संयोजक विजय सालीम, सहसंयोजक सुशांत चवंडे, जिल्हा परिषद संयोजक- प्रसाद पाटील, किसन घाणेकर, उमेश कुळकर्णी, राजेंद्र शिवलकर, ॲड. महेंद्र मांडवकर, सौ. ऐश्वर्या जठार, राजेश सावंत, अभय दळी, नीलेश लाड, सुधीर शिंदे. पंचायत समिती संयोजक- मिलिंद वैद्य, नंदकुमार बेंद्रे, सदाशिव पाचकुडे, वसंत रेवाळे, उमेश देसाई, सचिन दुर्गवळी, नीलेश लोंढे, स्नेहा चव्हाण, तनया शिवलकर, विनय मुकादम, संजय निवळकर, संकेत कदम, गजानन धनावडे, गुरू गोविलकर, संतोष बोरकर, प्रवीण पाथरे, संजय पाथरे आणि गीतेश दामले. शहर संयोजक- सचिन करमरकर व संदीप सुर्वे.


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

