गृहनिर्माण, पतसंस्थांमधील सीएंच्या भूमिकेबाबत चर्चासत्र

रत्नागिरी : सीए इन्स्टिट्यूटच्या येथील शाखेतर्फे रेरा आणि को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, को-ऑपरेटिव्ह पतसंस्था याविषयी चर्चासत्र पार पडले.

हॉटेल विवेक येथे पार पडलेल्या या चर्चासत्राला प्रमुख वक्ते म्हणून मुंबईतील को-ऑपरेटिव्ह आणि रियल इस्टेटमध्ये काम पाहणारे ज्येष्ठ सीए रमेश प्रभू, सीए शिल्पा शिनगारे व कोल्हापूर येथील सीए सुनील नागावकर यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रास्ताविकात शाखेच्या अध्यक्षा सीए अभिलाषा मुळ्ये यांनी चर्चासत्राचे उद्दिष्ट स्पष्ट केले. सीएने फक्त इन्कम टॅक्स, जीएसटी आणि ऑडिट यात अडकून न पडता अर्थव्यवस्थेची गरज असलेल्या को-ऑपरेटिव्ह, रेरा या क्षेत्रांकडे पण सकारात्मक दृष्टीने बघितले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

प्रथम सत्रात सीए रमेश प्रभू यांनी रेरा अॅक्ट कसा अस्तित्वात आला, याची पार्श्वभूमी सांगत सीए रियल इस्टेट क्षेत्रात कसे योगदान करता येते, याविषयी मार्गदर्शन केले. को-ऑपरेटिव्ह क्षेत्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी भारत सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेत सीएंचे ग्रामीण, निमशहरी अर्थव्यवस्थांमध्ये असलेले महत्त्व विशद केले.

द्वितीय सत्रात सीए सुनील नागावकर यांनी भारतातील को-ऑपरेटिव्ह बँकिंग, पतसंस्था यामध्ये होणाऱ्या व्यवहारांमध्ये एकट्या महाराष्ट्राचे प्रमाण ५० टक्के असल्याचे सांगितले. को-ऑपरेटिव्ह बँक तसेच पतसंस्था यांविषयी नवीन धोरणे आणि ऑडिटर म्हणून सीएंची जबाबदारी याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

तिसऱ्या सत्रात सीए शिल्पा शिनगारे यांनी चार्टर्ड अकाउंटंट हे फक्त ऑडिटर म्हणून भूमिका न बजावता को- ऑपरेटिव्ह क्षेत्रात एक सल्लागार म्हणून आपल्या ज्ञानाचा उपयोग करत कशा प्रकारे काम करून शकतात, याविषयी मार्गदर्शन केले.

चर्चासत्रातील तीन सत्रांसाठी अध्यक्ष म्हणून सीए भूषण मुळ्ये, सीए चिंतामणी काळे व सीए अभिलाषा मुळ्ये यांनी काम पाहिले. सीए मीनल काळे यांनी सूत्रसंचालन केले. शाखेचे कोषाध्यक्ष सीए अक्षय जोशी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सीए शाखेचे उपाध्यक्ष सीए शैलेश हळबे, सचिव सीए केदार करंबेळकर, कोषाध्यक्ष आणि पश्चिम भारत सीए विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सीए अक्षय जोशी, समिती सदस्य सीए प्रसाद आचरेकर, माजी अध्यक्ष सीए बिपीन शाह यांच्यासह रत्नागिरीतील सीए उपस्थित होते.

सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेने आयोजित केलेल्या चर्चासत्राचे दीपप्रज्वलनाने उद्गाटन करताना सीए रमेश प्रभू. सोबत सीए शिल्पा शिनगारे, सीए अभिलाषा मुळ्ये

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply