Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक योगभवनाचे रत्नागिरीत उद्घाटन

Advertisements

रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या रत्नागिरीतील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक योगभवनाचे उद्घाटन संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांच्या हस्ते आज झाले. यावेळी रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे आणि वैद्य मंदार भिडे उपस्थित होते.

यावेळी नाणिज येथील गुरुकुलमधील विद्यार्थ्यानी वैदिक मंत्रघोष केला. मंत्रघोषात प्रा. त्रिपाठी यांच्या हस्ते योगभवनाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.

यानंतर उपकेंद्रात योगशास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या एमए योगशास्त्र आणि बीए योगशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले.

याप्रसंगी रत्नागिरीतील सुपरिचित वैद्य मंदार भिडे यांनी आपल्या अमोघ वाणीतून आयुर्वेद, दिनचर्या आणि स्वास्थ्य यावर विस्तृत प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात प्रो. त्रिपाठी म्हणाले की, आपल्या शास्त्रात विविध विषयांचे अमूल्य ज्ञान आहे. केवळ त्याची अंमलबजावणी आपल्या आयुष्यात करणे आवश्यक आहे. आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर नियमपालन करणे आवश्यक आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन स्वरूप काणे यांनी केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version