सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा

मालवण : त्रिंबक (ता. मालवण) येथील वाचन कलाविकास समिती त्रिंबक संचालित कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालयाने दादा ठाकूर (आचरे- पारवाडी) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.

ही स्पर्धा रविवार, दि. ९ मार्च २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता त्रिंबक येथील जनता विद्या मंदिराच्या सभागृहात होणार आहे.

स्पर्धेचे विषय असे – १) वाचन आहे प्रवास सुंदर, २) भारताचे संविधान भारताचे हृदय, ३) जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा, ४) अभिजात मराठी आणि आमची कर्तव्ये, ५) ते अमर हुतात्मे झाले (कोणत्याही एका क्रांतिकारकांविषयी विचार. यापैकी कोणताही एक विषय स्पर्धकाने निवडावयाचा आहे. सादरीकरणाची किमान वेळ ६ मिनिटे, तर कमाल ८ मिनिटे आहे. गेल्या २ जानेवारीपूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणताही स्पर्धक स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे २०००, १५०० आणि १००० रुपयांची रोख पारितोषिके आणि स्मृतिचिन्ह दिले जाईल. प्रथम आलेल्या १५ स्पर्धकांना स्पर्धेत प्रवेश दिला जाईल. स्पर्धकांनी आपली नावे ग्रंथपाल अमेय लेले (९४२०६८४६१२) किंवा उपग्रंथपाल विवेक जाधव (९४२०७६३०१९) यांच्याकडे २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत द्यावीत. स्पर्धकांची संख्या १५ झाली की नोंदणी बंद केली जाईल. तसेच १० पेक्षा जास्त स्पर्धकांचा सहभाग असल्यास उत्तेजनार्थ प्रत्येकी पाचशे रुपयांची दोन पारितोषिके आणि स्मृतिचिन्ह देण्यात येतील. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.

अधिक माहितीसाठी वाचनालयाचे अध्यक्ष सुरेंद्र सीताराम सकपाळ (९४२३३०१५८४) यांच्याशी संपर्क साधावा. त्यानंतर प्रवेश अर्ज व्हॉट्स ॲप क्रमांकावर पीडी.फ स्वरूपात पाठविण्यात येईल. तो भरून वेळेत पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply