छत्रपती संभाजी महाराज निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

देवरूख : येथील रत्नागिरी जिल्हा गाव विकास समितीने आयोजित केलेल्या छत्रपती संभाजी महाराज जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विनया शैलेश जाधव (माभळे) हिने पहिला, तर ऐश्वर्या दिनेश शिंदे (लांजा) हिने दुसरा क्रमांक पटकावला आहे.

गाव विकास समितीमार्फत संघटन प्रमुख सुहास खंडागळे, अध्यक्ष उदय गोताड, उपाध्यक्ष राहुल यादव, मंगेश धावडे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी रत्नागिरी जिल्हास्तरीय छत्रपती संभाजी महाराज निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या निबंध स्पर्धेसाठी ‘कोकणातील धार्मिक सलोखा – एक आदर्श’, ‘निवडणुका आणि कोकणातील विकासकामे’ हे विषय ठेवण्यात आले होते. या स्पर्धेला जिल्ह्यातील तरुण व विद्यार्थीवर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

स्पर्धेचा निकाल संघटनेमार्फत जाहीर करण्यात आला असून यामध्ये सुहास तानाजी गेल्ये (शिवने), जयंत गोपाल फडके (पूर्णगड), सायली संदीप गुरव (आंगवली) यांना उत्तेजनार्थ बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेच्या परीक्षक म्हणून संघटनेच्या महिला अध्यक्षा सौ. दीक्षा खंडागळे-गीते व उपाध्यक्ष सौ. अनघा कांगणे यांनी काम पाहिले.

यशस्वी स्पर्धकांना गाव विकास समितीमार्फत देवरूख येथे बक्षिसे वितरित केली जाणार आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply