शिरोड्याच्या मालवणी संमेलनाक सोमवारी येतलाय मा?

शिरोडा (ता. वेंगुर्ले) : आजगाव (ता. सावंतवाडी) येथील साहित्य प्रेरणा कट्टा संस्थेने सोमवारी (दि. ३१ मार्च) शिरोडा (ता. वेंगुर्ले) येथे मालवणी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. मालवणी भाषेचे प्रेमी या नात्यान या संमेलनाक जरूर येवचा, असो आग्रव आसा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे

शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाच्या सहयोगाने त्याच ग्रंथालयात हे संमेलन होणार आहे. साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या सलग त्रेपन्नाव्या मासिक कार्यक्रमाचे औचित्य साधून हे मालवणी संमेलन दुपारी ३.३० ते रात्री ८.०० या वेळेत होणार आहे. माजी माहिती संचालक आणि मालवणी भाषेचे अभ्यासक सतीश लळित यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाच्या कै. मच्छिंद्र कांबळी सभागृहात होणार आहे.

संमेलनाचे उद्घाटन सायंकाळी ४ वाजता होईल. त्यानंतर मालवणी साहित्यात काय असावे, काय नसावे या विषयावरील परिसंवाद होणार असून त्याचे अध्यक्षस्थान भाऊसाहेब गोसावी भूषविणार आहेत. परिसंवागाद सौ. कल्पना मळये आणि सौ. तनुजा तांबे सहभागी होणार आहेत. संध्याकाळी सव्वासहा वाजता कै. जयवंत दळवी यांचा मालवणीनामा या विषयावरील सादरीकरण तर साडेसहा वाजता डॉ. सई लळित यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे.

ज्येंका संमेलनाक येवची इच्छा आसां, तेंच्यानी विनय सौदागर हेंच्येकडे ९४०३०८८८०२ या क्रमांकाचेर संपर्क साधूचो, असे साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर आणि र. ग. खटखटे ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे यांनी सूचित केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply