Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

योगदिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा परिषदेतर्फे योगशिबिर आणि औषधी वृक्षारोपण

Advertisements

रत्नागिरी : अकराव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आज रत्नागिरी जिल्हा परिषदेने रत्नागिरी शहरातील उद्यमनगर येथील जिल्हा प्रशिक्षण केंद्रात योगशिबिराचे आयोजन केले होते. ‘सध्याचे आपले जीवन ताणतणावांचे आणि धकाधकीचे झाले असून, बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, वाढते प्रदूषण आणि स्पर्धा यामुळे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, स्थूलता यांसह अनेक शारीरिक आणि मानसिक विकारांमुळे दैनंदिन जीवन आनंदात व्यतीत करणे अवघड झाले आहे. अशा या धकाधकीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिक विकारांपासून दूर राहण्यासाठी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात नित्यनियमाने योगसाधना केल्यास जीवन आरोग्यदायी आणि आनंददायी होऊ शकेल,’ असे प्रतिपादन परीक्षित यादव यांनी या वेळी केले. योगप्रशिक्षक नेहा लिमये यांनी या वेळी मार्गदर्शन केले. श्रीमती प्रिया पेडणेकर यांनी योगप्रात्यक्षिके सादर केली. आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त हरितयोग कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या हस्ते जिल्हा प्रशिक्षण केंद्रात औषधी रोप लावण्यात आले. (फोटो/व्हिडिओ बातमीच्या शेवटी दिले आहेत.)

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या हस्ते जिल्हा प्रशिक्षण केंद्रात औषधी रोप लावण्यात आले.

या वेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, शिक्षणाधिकारी किरण लोहार, एम. बी. कासार, जिल्हा माता-बालसंगोपन अधिकारी डॉ. तुषार कुंभार, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मिताली मोडक, जिल्हा विस्तार आणि माध्यम अधिकारी एन. जी. बेंडकुळे, पी. एच. एन. श्रीमती प्रिया पेडणेकर, श्वेता तारये, धनंजय जाधव, निलीश गिह्मोनीकर, संजय साळवी, मंगेश जंगम, पूर्वा बापट, सुभद्रा अहिवले, कमलेश जोशी आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

1 / 7

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version