रत्नागिरीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांचे वडील अच्युत शिवराम आठल्ये (वय ८९ वर्षे) यांचे २७ जानेवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर देहदान करण्यात आले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब

गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांच्या आरोग्य तपासणीकरिता मुंबई-गोवा महामार्गावरच्या प्रमुख १६ ठिकाणी, तसेच खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि रत्नागिरी या चार रेल्वेस्थानकांवर आरोग्य तपासणी पथके तैनात करण्यात आली आहेत.
अकराव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आज रत्नागिरी जिल्हा परिषदेने रत्नागिरी शहरातील उद्यमनगर येथील जिल्हा प्रशिक्षण केंद्रात योगशिबिराचे आयोजन केले होते.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील १३०३ गावांमध्ये गेल्या सलग तीन वर्षांमध्ये हिवताप अर्थात मलेरियाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे ही कीटकजन्य आजारमुक्त गावे म्हणून घोषित करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.
रत्नागिरी : कोकणी माणूस व नाटक यांचा जवळचा संबंध आहे. अशा उपक्रमांची समाजाला नितांत गरज आहे. विविध आजार आणि त्यावरील उपायांबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी आरोग्य नाट्य स्पर्धा आयोजित केली हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे, असे गौरवोद्गार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी यांनी काढले.
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आज येथील शासकीय रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली.