रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांच्या आरोग्य तपासणीकरिता मुंबई-गोवा महामार्गावरच्या प्रमुख १६ ठिकाणी, तसेच खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि रत्नागिरी या चार रेल्वेस्थानकांवर आरोग्य तपासणी पथके तैनात करण्यात आली आहेत. खेड आणि रत्नागिरी तालुक्यात प्रत्येकी तीन, संगमेश्वरमध्ये पाच, चिपळूणमध्ये सहा, लांज्यात दोन, तर राजापुरात एक अशी जिल्ह्यात एकूण २० तपासणी पथके आहेत. ती आजपासून (२२ ऑगस्ट) सात सप्टेंबरपर्यंत कार्यरत राहणार आहेत. प्रत्येक पथकात प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी, आवश्यक औषधांचा साठा, तसंच प्रथमोपचार सुविधा उपलब्ध आहेत. तातडीच्या वैद्यकीय मदतीसाठी प्रत्येक केंद्रावर एका रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी नियोजन बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला असून, चाकरमान्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आणि गणेशोत्सव काळात नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. त्यामुळे या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत चेकपोस्टच्या ठिकाणी पेंडॉल उभारण्यात येतील. त्या ठिकाणी आरोग्य विभागासह सर्व संबंधित विभागांचे कर्मचारी तैनात राहून तपासणी करतील.
तालुकानिहाय पथक ठिकाणे पुढीलप्रमाणे
खेड (३ केंद्रे)
गुणदे फाटा (पेंडॉल)
भरणेनाका (पेंडॉल)
खेड रेल्वे स्टेशन
चिपळूण (६ केंद्रे)
पेढे सवतसडादर्शन (पेंडॉल)
कळंबस्ते तिठा (पेंडॉल)
बहादूरशेख नाका (पेंडॉल)
अलोरे घाटमाथा (चेकपोस्ट)
दहिवली फाटा (पेंडॉल)
चिपळूण रेल्वे स्टेशन
संगमेश्वर (५ केंद्रे)
तुरळ (पेंडॉल)
एसटी स्टँडजवळील ब्रिजचे वळण (पेंडॉल)
वांद्री (पेंडॉल)
देवरूख मुर्शी (चेकपोस्ट)
संगमेश्वर रेल्वे स्टेशन
रत्नागिरी (३ केंद्रे)
हातखंबा तिठा (पेंडॉल)
पाली (पेंडॉल)
रत्नागिरी रेल्वे स्टेशन
लांजा (२ केंद्रे)
वेरळ (पेंडॉल)
कुवे गणपती मंदिरासमोर (पेंडॉल)
राजापूर (१ केंद्र)
राजापूर एसटी स्टँड (पेंडॉल)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

