आश्वासनांच्या पावसात वाहून गेले रस्ते

नेहमीच येणारा पाऊस, त्यामुळे कोकणवासीयांची उडणारी दाणादाण, नेहमीच येणारा गणेशोत्सव, त्या काळात चाकरमान्यांना भोगावा लागणारा त्रास वर्षानुवर्षे तसाच आहे. वाहतुकीच्या सुविधा पुरविण्याच्या आश्वासनांच्या पावसात रस्ते मात्र वाहून गेले आहेत. यापुढेही ते तसेच वाहत राहतील. सण संपवून चाकरमानी परततील. खड्डे विसरतील. अगदी दरवर्षी येणाऱ्या गणपतीप्रमाणेच पुन्हा पुढच्या वर्षी त्याच खड्ड्यांमधून कोकणात आपापल्या गावी येतील.

गणेशोत्सवासाठी रत्नागिरीत येणाऱ्या चाकरमान्यांची होणार आरोग्य तपासणी; महामार्गावर २० पथके

गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांच्या आरोग्य तपासणीकरिता मुंबई-गोवा महामार्गावरच्या प्रमुख १६ ठिकाणी, तसेच खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि रत्नागिरी या चार रेल्वेस्थानकांवर आरोग्य तपासणी पथके तैनात करण्यात आली आहेत.

कोकण रेल्वेच्या गणेशोत्सव विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्याची मागणी

वसई : कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुरू असलेल्या विशेष रेल्वेगाड्यांना मुदतवाढ मिळावी, अशी मागणी वसई-सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

कोकणात रेल्वेगाड्या सोडण्यासाठी कोकण रेल्वे समन्वयक समितीचे आता फडणवीसांना साकडे

ठाणे : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गणपती गाड्या सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून त्याला यश आले नसल्याने कोकण रेल्वे समन्वयक समितीने आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे.

कांजूरमार्गच्या माऊली प्रतिष्ठानतर्फे कोकणवासीयांसाठी ई-पाससह बससेवा

मुंबई : कांजूरमार्ग येथे सामाजिक कार्य करणाऱ्या माऊली प्रतिष्ठानतर्फे कोकणवासीयांसाठी माफक दरात बससेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष