रत्नागिरी : जन्मतः व जन्मपश्चात श्रवणदोष असणाऱ्या किंवा अस्पष्ट बोलणाऱ्या, बोलताना अडचण येणाऱ्या सर्व बालकांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी तसेच मोठ्या वयोगटातील व्यक्तींसाठी येत्या रविवारी (दि. २० जुलै) रत्नागिरीत मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल (पवई, मुंबई) आणि रत्नागिरीतील आस्था सोशल फाउंडेशन या दिव्यांगांसाठी समर्पित संस्थेकडून हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत आस्था थेरपी सेंटरमध्ये (परकार हॉस्पिटलसमोर, शिवाजीनगर, रत्नागिरी) हे शिबिर होणार आहे.
या शिबिरात श्रवण व वाचा दोषासंदर्भात तपासणी करण्यात येणार आहे. तसेच त्यांना आवश्यक असणाऱ्या संदर्भ सेवा व त्यांच्या पालकांच्या शंकांचे निरसन करण्यात येईल. शिबिरात कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. कश्मिरा चव्हाण व ऑडिओलॉजिस्ट श्रीमती प्राजक्ता भोगटे या मुलांच्या ऐकण्या व बोलण्यासंदर्भातील समस्यांबाबत मार्गदर्शन करणार आहेत. शिबिराला येताना पालकांनी मुलांच्या पूर्वतपासणी रिपोर्ट सोबत आणावेत. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील श्रवण व वाचादोष असलेले कोणतेही बालक उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नये, लवकरात लवकर योग्य निदान होऊन बालके आवश्यक उपचारांनंतर मुख्य प्रवाहात यावी यासाठी या शिबिराचे आयोजन केले आहे.
आस्था दिव्यांग हेल्पलाइनचे प्रमुख समन्वयक व स्पीच थेरपिस्ट संकेत चाळके यांनी सांगितले सांगितले की, OAE, BERA, PTA या वैयक्तिक तपासण्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ना नफा ना तोटा तत्त्वावर शुल्क आकारून आकरण्यात येतील.
जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञ, कान नाक घसा तज्ज्ञ, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी त्यांच्या संपर्कातील अशा बालकांच्या पालकांना या शिबिराची माहिती द्यावी, असे आवाहन आस्थाच्या सचिव व प्रकल्प संचालक श्रीमती सुरेखा पाथरे यांनी केले आहे. या शिबिरासाठी नावनोंदणी पालकांनी १० ते ६ या वेळेत 7045452424 या क्रमांकावर करावी.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

