गाव विकास समितीतर्फे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा

देवरूख : रत्नागिरी जिल्हा गाव विकास समितीतर्फे छत्रपती संभाजी महाराज जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील तरुण-तरुणींना स्थानिक प्रश्नांवर विचार करण्यास आणि आपल्या लेखणीतून ते मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या स्पर्धेचे हे सातवे वर्ष आहे. स्पर्धेसाठी निबंध स्वीकारण्याची अंतिम तारीख १० नोव्हेंबर २०२५ आहे. गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड, संघटन प्रमुख सुहास खंडागळे, उपाध्यक्ष राहुल यादव, उपाध्यक्ष मंगेश धावडे आणि जिल्हाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील तरुणांना आपल्या भागातील आरोग्य सुविधा, कृषी विकास यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर लिखाण करण्याची संधी मिळावी, हा या स्पर्धेमागील प्रामाणिक उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

यावर्षी महाविद्यालयीन खुल्या गटासाठी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा : सद्यःस्थिती, आव्हाने आणि अपेक्षा तसेच आंबा-काजूच्या पलीकडे : रत्नागिरीतील कृषी विकास का झाला नाही हे दोन विषय आहेत. स्पर्धकांनी १००० ते १२०० शब्दांत स्वलिखित आणि मराठी भाषेतील निबंध सादर करणे आवश्यक आहे. पहिल्या दोन विजेत्यांना अनुक्रमे ५००१ आणि ३००१ रुपयांची, तर ५ स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील. प्रत्येक स्पर्धकाला सहभागाबद्दल प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

स्पर्धकांनी आपले निबंध एम जी टेक्नॉलॉजी, देवरूखहायस्कूलसमोर, देवरूख, संगमेश्वर, जि. रत्नागिरी या पत्त्यावर अंतिम मुदतीपर्यंत पाठवावेत. अधिक माहितीसाठी दीक्षा खंडागळे (९४०४१५८३८४), अनघा कांगणे (८५५२९७४०७३), नितीन गोताड (९३२२५१६८८६) आणि मुझम्मिल काझी (९६०४७६०३३०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गाव विकास समितीने केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply