Description

मंत्र आरोग्याचा
लेखक : अनंत मुकुंद आगाशे, रत्नागिरी
प्रकाशक : सत्त्वश्री प्रकाशन, रत्नागिरी
पृष्ठे : ८८
मूल्य : १०० रुपये
…………..
पुस्तक आणि लेखकाविषयी…
रत्नागिरीच्या आगाशे डिपार्टमेंटल स्टोअरचे अध्वर्यु अनंत मुकुंद आगाशे यांच्यातील उद्योजकतेची कथा प्रथितयश लेखक श्री. सुमेध रिसबूड (वडावाला) यांनी ‘सामर्थ्य आहे श्रमाचे’ या पुस्तकात रेखाटली आहे. २०२२ साली प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकानंतर श्री. अनंत मुकुंद आगाशे यांनी स्वतःच लिहिलेले पुस्तक म्हणजे ‘मंत्र आरोग्याचा…’
श्री. आगाशे यांनी हरिद्वारच्या पतंजली योगपीठातर्फे २००९मध्ये पहिले योग शिबिर रत्नागिरीत आयोजित केले. त्यानंतर अनेक लोकांना मोफत योग शिकता यावा आणि आपल्या आरोग्य समस्यांचे निराकरण करता यावे, यासाठी रत्नागिरी शहर आणि तालुक्यात अनेक शिबिरे आयोजित केली. उद्दिष्ट केवळ एकच – प्रत्येकाने दररोज योग-प्राणायाम, आसने, सूर्यनमस्कार करावेत. योगाभ्यासाच्या प्रसाराचाच एक भाग म्हणून रत्नागिरीतील ओम साई योग कक्षाकडून गेली अनेक वर्षे सातत्याने दररोज न चुकता सराव करून घेतला जातो. तोही अगदी पूर्णपणे मोफत. त्यातूनच ‘मंत्र आरोग्याचा’ हे पुस्तक लिहिण्याची कल्पना त्यांना सुचली. श्री. मिलिंद सरदेसाई यांच्या सहकार्याने साकारलेले हे पुस्तक योगप्रेमींना सादर करताना त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांना ज्यांच्याकडून योगाचे मार्गदर्शन लाभले, ते श्री. विनय साने, सौ. रमाताई जोग आणि सौ. पूर्णिमा दाते यांच्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
(हे पुस्तक गुगल प्ले बुक्सवर ई-बुक स्वरूपात उपलब्ध आहे.)
📲 ई-बुक लिंक :
🔹 अँड्रॉइडसाठी : https://play.google.com/store/books/details?id=HqpyEQAAQBAJ
🔹 वेब ब्राउझर आणि आयफोनसाठी : https://books.google.co.in/books?id=HqpyEQAAQBAJ











Reviews
There are no reviews yet.