मालवण : भारतीय नौदलाच्या गणवेशावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेपासून प्रेरित मानचिन्हांचा समावेश केला जाणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (४ डिसेंबर २०२३) येथे सांगितले.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
मालवण : भारतीय नौदलाच्या गणवेशावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेपासून प्रेरित मानचिन्हांचा समावेश केला जाणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (४ डिसेंबर २०२३) येथे सांगितले.
नौदल दिनानिमित्त आज (४ डिसेंबर २०२३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण होणार आहे. कार्यक्रम लाइव्ह पाहा पुढील लिंकवर…
रत्नागिरी : शिवजन्म ते शिवरायांच्या राज्याभिषेकापर्यंतची शिवकथा अनुभवताना शिवप्रेमींच्या अंगावर रोमांच उभे राहिले. सुप्रसिद्ध प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे यांनी शिवइतिहास उभा करताना शिवरायांइतकीच किंबहुना त्याहून अधिक जिजाऊंच्या विचारांची देशाला खरी गरज असल्याचे प्रतिपादन केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांची ब्रिटनमध्ये असलेली जगदंब तलवार व वाघनखे भारतात आणण्याच्या दृष्टीने ब्रिटिश उपउच्चायुक्त अॅलन गॅम्मेल यांनी ब्रिटिश सरकारच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या संदर्भात १५ एप्रिलला मुंबईत त्यांच्याशी झालेली चर्चा अत्यंत समाधानकारक झाली असून, त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील दृढ निश्चय पूर्ण होणार आहे, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.