किल्ल्यांची जागतिक वारसास्थळांमध्ये निवड झाल्याचा नाचणे शाळेत आनंदोत्सव

रत्नागिरी : जागतिक वारसास्थळांमध्ये महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश झाल्याबद्दल नाचणे क्र. १ (ता. जि. रत्नागिरी) जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी आनंदोत्सव साजरा केला. जागतिक वारसास्थळांमध्ये महाराष्ट्रातील किल्ल्यांची निवड होणे हे आपल्यासाठी अभिमानास्पद असून, त्यातही रत्नागिरी जिल्ह्यातील सुवर्णदुर्ग या किल्ल्याची नोंद घेतल्याने अधिक आनंद झाला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्व किल्ल्यांची माहिती घेतली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत मुलांनी आनंद व्यक्त केला. या वेळी शाळेतील शिक्षक शरदिनी मुळे, दीपक नागवेकर, विनोदिनी कडवईकर, विद्या कोकजे, पूजा हळदणकर उपस्थित होते.

राज्याचे उद्योग आणि मराठी भाषामंत्री, तसेच रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलेली भावना सोबतच्या व्हिडिओत…

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply