१८ जानेवारी हा बॅ. नाथ पै यांचा स्मृतिदिन. सध्या त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. कोकणी जनतेने आपल्या ह्या लाडक्या नेत्याला अनेक बिरुदांच्या आभूषणांनी भूषविले. अगदी ‘लोकशाहीचा कैवारी’पासून ‘अनाथांचा नाथ’पर्यंत एक ना अनेक; पण त्या सर्वांत ‘वक्ता दशसहस्रेषु’ हे आभूषण नाथ पैंना जिरेटोपासारखे शोभून दिसायचे. बालपणी बॅ. नाथ पै यांची अनेक रसाळ भाषणे ऐकण्याची सुवर्णसंधी ज्यांना प्राप्त झाली, ते आचरा (मालवण) येथील ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांनी नाथ पै यांच्या अमोघ वक्तृत्वाबद्दल लिहिलेला सिंधुसाहित्यसरिता पुस्तकातील लेख येथे प्रसिद्ध करत आहोत. तसेच नाथ पै यांची दशावतारी नाटकातील कलाकारांसंदर्भातील एक हृद्य आठवण ही लेखाच्या शेवटी दिलेल्या व्हिडिओत सांगितलेली आहे.
