मालवण पंचायत समितीने विकसित केले पहिले शैक्षणिक अॅप; ऑफलाइनही उपयुक्त

करोनाप्रतिबंधक लॉकडाउनमुळे इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच शैक्षणिक क्षेत्रावरही दुष्परिणाम झाला आहे. विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर बसले आहेत, ज्ञानार्जन आणि ज्ञानदान केले जात आहे, ही नेहमीची प्रक्रिया सुरू व्हायला आणखी किती काळ जाईल, हे सांगता येणार नाही. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाकडे साऱ्यांचेच लक्ष वळले आहे. शिक्षण विभागानेही आता त्याला मान्यता दिली आहे. त्याकरिता शैक्षणिक क्षेत्रातील अनेक जण विविध उपक्रम राबवत आहेत. अनेक अॅप्स तयार केली जात आहेत; पण पंचायत समितीने पुढाकार घेऊन अॅप तयार करण्याचा पहिलाच प्रयोग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पंचायत समितीने राबविला आहे.

मालवण तालुक्यातील रक्षाबंधन कोकमाच्या झाडांमधून होणार अविस्मरणीय

मालवण पंचायत समिती सोमवारी (ता. ३ ऑगस्ट) साजऱ्या होणार असलेल्या रक्षाबंधनाच्या सणातून कोकमाच्या लागवडीचा संदेश देणार आहे.

मालवणमध्ये ऑनलाइन विज्ञानकथा पंधरवड्याची सुरुवात

मालवण : मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण आणि साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने कथामाला, सेवांगण आणि कोमसाप या ग्रुपवर ऑनलाइन विज्ञानकथा पंधरवड्याचा नुकताच शुभारंभ झाला. बॅ. नाथ पै सेवांगणचे कार्याध्यक्ष दीपक भोगटे यांनी आल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञाची कथा प्रभावी कथनशैलीत सादर करून या उपक्रमाची सुरुवात केली. या अंतर्गत सिंधुदुर्गाबरोबरच राज्यभरातील मुलांसाठी दररोज एक विज्ञानकथा सादर केली जाणार आहे.