चक्रीवादळामुळे रायगडात काही लाख घरांचे नुकसान; रत्नागिरीत तीन हजार झाडे जमीनदोस्त

रत्नागिरी/मुंबई : तीन जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात लाखो घरांचे नुकसान झाले आहे. एक लाखाहून जास्त झाडे पडली आहेत. तसेच, रत्नागिरी जिल्ह्यात दापोली आणि मंडणगडमध्ये जास्त नुकसान झाले आहे. तेथे तीन हजार झाडे आणि विजेचे एक हजार ९६२ खांब मोडून पडले आहेत. रत्नागिरीत महावितरणची १४ उपकेंद्रे कालच्या वादळात नादुरुस्त झाली असून, ती दुरुस्त करण्याचे काम सुरू झाले आहे.

चक्रीवादळ अखेर मंदावले; अचूक अंदाज, योग्य नियोजनामुळे जीवितहानी टळली

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी/अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळच्या किनाऱ्यावर ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने धडकलेले निसर्ग चक्रीवादळ अखेर मंदावले आहे. या वादळामुळे

चक्रीवादळ अलिबागजवळ धडकण्याची प्रक्रिया सुरू; वाऱ्यांचा वेग १०० किमीहून अधिक

रत्नागिरी : भारतीय हवामान विभागाने तीन जूनला दुपारी एक वाजता जाहीर केलेल्या माहितीनुसार, निसर्ग चक्रीवादळ जमिनीला धडकण्याची (लँडफॉल) प्रक्रिया दुपारी साडेबारापासून सुरू झाली आहे. पुढील तीन तासांत ती प्रक्रिया पूर्ण होईल. सध्या चक्रीवादळाच्या व्यासाचे ईशान्येकडील टोक जमिनीवर पोहोचले आहे.