जिल्हाधिकाऱ्यांची मुले अंगणवाडीत

खासगी शाळांमध्ये चांगले शिक्षण मिळते, असा समज सरकारी शिक्षकांनीच आपल्या कृतीतून तयार केला आहे. अलीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांना अनेक उत्तम भौतिक सुविधा मिळतात. पण त्यांचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात शिक्षक अपुरे ठरतात. नंदुरबारमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनीच आपली मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत घातल्यामुळे त्यांचा आदर्श तेथील अधिकारी घेतील आणि त्यामुळे शाळांचा शैक्षणिक दर्जाही सुधारायला नक्कीच मदत होईल. तोच आदर्श सर्व ठिकाणच्या शासकीय अधिकाऱ्यांनी घ्यायला हवा.

खेडशीतील अंगणवाड्यांमध्ये विविध कार्यक्रम

खेडशी (ता. जि. रत्नागिरी) ग्रामपंचायतीअंतर्गत सर्व अंगणवाड्यांनी मिळून ५ ऑगस्ट २०२२ रोजी ‘कम्युनिटी बेस्ड इव्हेंट्स’ (CBE) अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन गयाळवाडी येथे केले होते.