खेडशीतील अंगणवाड्यांमध्ये विविध कार्यक्रम

खेडशी : खेडशी (ता. जि. रत्नागिरी) ग्रामपंचायतीअंतर्गत सर्व अंगणवाड्यांनी मिळून ५ ऑगस्ट २०२२ रोजी ‘कम्युनिटी बेस्ड इव्हेंट्स’ (CBE) अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन गयाळवाडी येथे केले होते. स्तनपान सप्ताह मेळावा, अन्नप्राशन, प्रवेशोत्सव, सुपोषण, गरोदर माता नवीन नोंदणी मेळावा, इत्यादी कार्यक्रमांचा त्यात समावेश होता. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने जनजागृतीपर कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. मुलांचे नृत्य आदी कार्यक्रमही या वेळी सादर झाले. कार्यक्रमांचे नियोजन खेडशी गावातील गयाळवाडी, स्वरूपानंद नगर, पारसनगर, डफळवाडी, चिंचवाडी आणि खेडशी ग्रामपंचायत या अंगणवाड्यांमधील अंगणवाडी सेविकांनी केले होते. रेखा भारती (गयाळवाडी), सेजल भारती (स्वरूपानंद नगर), आकांक्षा जाधव (पारसनगर), रंजना घवाळी (डफळवाडी), श्रेया मोहिते (चिंचवाडी), अनामिका सावंत (खेडशी ग्रामपंचायत) या अंगणवाडी सेविकांचा त्यात समावेश होता.

या वेळी खेडशीच्या सरपंच घाणेकर मॅडम यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, मुलांसह पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. त्या कार्यक्रमांचे फोटोज सोबत दिले असून, अंगणवाडी योजनांबद्दलच्या अंगणवाडी सेविकांनी सादर केलेल्या गीताचा व्हिडिओही सोबत दिला आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply