‘आठवणीतलं कोकण’ : कोकण मीडिया दीपोत्सव विशेषांकाचे मालवणला थाटात प्रकाशन

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष आणि लेखक सुरेश ठाकूर यांच्या हस्ते साप्ताहिक कोकण मीडियाच्या यंदाच्या (२०२३) दीपोत्सव विशेषांकाचे मालवणला थाटात प्रकाशन झाले.

‘आठवणीतलं कोकण’ लेख स्पर्धेचा निकाल जाहीर; कोकण मीडिया दिवाळी अंकाचे ७ नोव्हेंबरला प्रकाशन

साप्ताहिक कोकण मीडियाने दिवाळी अंकासाठी आयोजित केलेल्या ‘आठवणीतलं कोकण’ या विषयावरच्या डॉ. अशोक प्रभू स्मृती लेख स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विजेत्यांच्या लेखांसह ‘आठवणीतलं कोकण’ या विषयावरच्या अन्य निवडक लेखांचा समावेश असलेला साप्ताहिक कोकण मीडियाचा यंदाचा दर्जेदार दिवाळी अंक सात नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होत आहे.

कोकण मीडियाचा २०२३चा दिवाळी अंक आठवणीतल्या कोकणावर…; लेख आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन

साप्ताहिक कोकण मीडियाचा २०२३चा दिवाळी विशेषांक ‘आठवणीतलं कोकण’ या विषयाला वाहिलेला आहे. ‘आठवणीतलं कोकण’ या विषयावर लेख आणि चित्रं मागवण्यात येत असून, सर्वोत्कृष्ट लेख आणि चित्रांना रोख पारितोषिकं दिली जाणार आहेत. सविस्तर वाचा पुढे…