महाराष्ट्राचे मत्स्योत्पादन ४७ टक्क्यांनी वाढल्यामुळे देशाची उत्पादनघट कमी होण्यास मदत

मुंबई : देशाच्या सागरी मत्स्योत्पादनात २०२४मध्ये दोन टक्के घट झाली आहे; मात्र महाराष्ट्राचे मत्स्योत्पादन ४७ टक्क्यांनी वाढले आहे. सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (सीएमएफआरआय) अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. राज्याचे मत्स्योत्पादन वाढल्यामुळे देशाच्या मत्स्योत्पादनातील घट कमी होण्यास हातभार लागला आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता २० जूनला मिळणार; पण ई-केवायसी आणि आधार सीडिंग आवश्यक

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै या कालावधीतील २० वा हप्ता २० जून रोजी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

कोकणातील शेतकऱ्यांनी आत्मपरीक्षण करून शेतीत विविधता आणावी आणि ती वाढवावी : डॉ. उदय सामंत

‘रत्नागिरीच्या हापूस आंब्याला आंतरराष्ट्रीय दर्जा आहे. त्याचप्रमाणे कोकणात काजू उत्पादनातूनही ब्राझीलप्रमाणे क्रांती होऊ शकते. नोकरीच्या तुलनेत शेतीतून दसपट अधिक पैसे मिळू शकतात; मात्र त्यासाठी आत्मपरीक्षण करून शेती वाढवली पाहिजे. शेतीत विविधता आणली पाहिजे. भात, नाचणीबरोबरच फळबागा लागवड क्षेत्र वाढवलं पाहिजे. कृषी प्रदर्शनाचा उपयोग करून घेऊन शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करावेत,’ असं आवाहन रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केलं.

जिल्हास्तरीय कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताहाचे उद्घाटन; कृषी आणि पशू प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद

रत्नागिरीत आज (१० मे) अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह आणि कृषी विकास परिषदेचं उद्घाटन झालं.

रत्नागिरीत १० मेपासून जिल्हास्तरीय कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह; शेतकरी आणि बचत गटांना मोफत दालने

रत्नागिरी शहरातील स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात १० मे ते १२ मे या कालावधीत जिल्हास्तरीय कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह व कृषी विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन १० मे रोजी सकाळी १० वाजता राज्याचे कृषिमंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. यात एकूण १६५ दालने असतील आणि प्राधान्याने जिल्ह्यातील शेतकरी व बचतगट यांना मोफत दालने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा; राज्य मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय

मुंबई : राज्यात मत्स्यव्यवसायाला आजपासून (२२ एप्रिल २०२५) कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्याचा राज्यातील ४ लाख ८३ हजार मच्छीमारांना फायदा होणार आहे.