रत्नागिरीत १० मेपासून जिल्हास्तरीय कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह; शेतकरी आणि बचत गटांना मोफत दालने

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात १० मे ते १२ मे या कालावधीत जिल्हास्तरीय कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह व कृषी विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन १० मे रोजी सकाळी १० वाजता राज्याचे कृषिमंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात आंबा व शेतमाल उत्पादक ते ग्राहक थेट विक्रीचे स्वतंत्र दालन, बचत गटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री, पशू-पक्षी प्रदर्शन, कृषी व कृषी संलग्न विभागांची स्वतंत्र दालने, अत्याधुनिक कृषी यंत्रे अवजारे यांची स्वतंत्र दालने, कृषी निविष्ठांची स्वतंत्र दालने, खवय्यांसाठी रुचकर अस्सल कोकणी पदार्थांची मेजवानी अशी एकूण १६५ दालने असणार आहेत. यात प्राधान्याने जिल्ह्यातील शेतकरी व बचतगट यांना मोफत दालने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

जिल्हा नियोजन समिती, प्रकल्प संचालक, आत्मा, कृषी विभाग व पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद यांच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधू आणि भगिनी, तसेच प्रक्रिया उद्योजक, पशुपालक यांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले व प्रकल्प संचालक (आत्मा) विजय बेतीवार यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषि राज्यमंत्री अ‍ॅड. आशिष जयस्वाल, गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम, खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे, विधान परिषद सदस्य आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रसाद लाड, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, विधानसभा सदस्य आमदार भास्करराव जाधव, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, सिंधुरत्न समृद्ध योजना समिती अध्यक्ष दीपक केसरकर, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे हे उपस्थित राहणार आहेत.
यात प्राधान्याने जिल्ह्यातील शेतकरी व बचतगट यांना मोफत दालने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. दालनांच्या नोंदणीसाठी रोहन चोथे ९८३४४८७१३८ व अमोल क्षीरसागर ८१८०८१३५६४ यांच्याशी संपर्क साधावा.
याबरोबरच जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान, कृषिविषयक विविध परिसंवाद, खरेदीदार-विक्रेता संमेलन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन या वेळी करण्यात आले आहे. १० मे २०२५ रोजी पौष्टिक तृणधान्ये व पारंपरिक अशा दोन्ही प्रकारात पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी ६० जणांना सहभागी होता येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दि. ७ मे रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत हर्षला पाटील ९४२२४४१५७१, गौरी शेरे ८८३०६४८०७७ यांच्याकडे नावे नोंदविण्यात यावीत. यासाठी प्रवेश निःशुल्क आहे.
कृषी व कृषी संलग्न विविध योजनांची माहिती व प्रात्यक्षिके या कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रदर्शित केली जाणार आहेत. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आज नियोजनासंदर्भात आढावा आढावा घेतला. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले व आत्माचे प्रकल्प संचालक विजय बेतीवार, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply