कोकण स्वरप्रतिभा शास्त्रीय गायन स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : पणजी (गोवा) येथील स्वस्तिक कल्चरल असोसिशनतर्फे लहान मुलांसाठी कोकण स्वरप्रतिभा ही शास्त्रीय गायनाची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

लहान मुलांना अभिजात संगीताकडे आकर्षित करण्यासाठी आणि हा शास्त्रीय संगीताचा समृद्ध वारसा नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी या स्पर्धेचे खास आयोजन केले आहे.

स्वस्तिक कल्चरल असोसिएशन ही संस्था गेली अनेक वर्षे शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात कार्यरत आहे. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात नवनवीन संकल्पना राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोकण स्वरप्रतिभा ही स्पर्धा रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, तसेच कारवार, अंकोला, कुमटा, होनावर, भटकळ, कुंदापूर, उडुपी, ठोकूर, मंगलोर या कर्नाटक राज्यातील क्षेत्रासाठी आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धा केवळ हिंदुस्तानी शास्त्रीय गायनासाठी खुली आहे. प्रत्येक सहभागीने छोटा ख्याल सादर करणे आवश्यक आहे. स्पर्धा ५ ते १३ वयोगटासाठी आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून, स्पर्धकानी त्यांचे गायनाचे व्हिडीओ आयोजकांना १५ मेपूर्वी पाठवावे. व्हिडीओमध्ये तबला व हार्मोनियम किंवा सारंगीसह साथसंगत आवश्यक आहे. त्याचबरोबर मॅन्युअल किंवा डिजिटल तानपुरा चालेल. व्हिडीओ ५ ते ७ मिनिटांचा असावा. सहभागींनी सादर केलेला राग, ताल व बंदिश स्पष्टपणे सांगणे आवश्यक आहे. अंतिम फेरीसाठी १५ स्पर्धक पात्र ठरतील. अंतिम फेरी पणजी येथे आयोजित करण्यात येईल. याची तारीख व स्थळ नंतर कळविण्यात येईल.

अंतिम फेरीत यशश्वी स्पर्धकांसाठी अनुक्रमे ३३,३३३ रुपये, २२,२२२ रुपये आणि ११,१११ रुपयांची पहिली तीन पारितोषिके तसेच ५,५५५ रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार आहे.

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी स्वस्तिक कल्चरल असोसिएशन गोवा, नवेलकर आर्केड, एसएफ, ०१- बी, बी विंग, दुसरा मजला, डॉ. ए. पी. रोड पणजी, गोवा ४०३००१ या कार्यालयात किंवा स्वस्तिकचे संयोजक सुयोग पटवर्धन (९९२१४४९५९८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांमार्फत कळवण्यात आले आहे.

इच्छुक स्पर्धकांनी स्पर्धेतील सहभागासाठी सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करून अर्ज सादर करावा.

KONKAN SWAR PRATIBHA – 1

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply