मकरंद पटवर्धन यांना ‘बाळगोपाळांचा सायकलदोस्त’ सन्मान प्रदान

रत्नागिरी : लहान मुलांना सायकलची गोडी लावण्यासाठी प्रभावीपणे काम करणारे रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे मकरंद पटवर्धन यांना ‘बाळगोपाळांचा सायकलदोस्त’ हा सन्मान प्रदान करण्यात आला. किड्स सायक्लोथॉनच्या औचित्याने हा सन्मान माळनाका येथील तारांगण परिसरात सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या संकल्पनेतून प्रदान करण्यात आला. (व्हिडिओ बातमीच्या शेवटी)

मकरंद पटवर्धन यांनी कोरोना कालावधीपासून दररोज सायकलिंगला प्रारंभ केला. गेल्या चार वर्षांत त्यांनी जवळपास ८००० किलोमीटर सायकलिंग केले आहे. कोरोना काळामध्ये मिऱ्या बंदर येथे दररोज सायकलिंग करताना त्यांनी जोशी पाळंद, टिळक आळी, खालची आळी, मांडवी, भागातील बालदोस्तांनाही सोबत नेले आणि त्यांना सायकलिंगची गोडी लावली. सुरुवातीला मुलगा अर्णव आणि नंतर सर्व बालदोस्त मंडळी मिऱ्या येथे सायकलिंग करू लागले. वाहतुकीचे नियम पाळून सायकलिंग कसे करावे, कुठलीही दुखापत न होता सायकल कशी चालवली पाहिजे याचे धडे त्यांनी मुलांना दिले. याकरिता मकरंद पटवर्धन यांना हा सन्मान देण्यात आला. सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी यांनी तयार केलेले सन्मानपत्र त्यांना देण्यात आले.
याप्रसंगी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे महेश सावंत, डॉ. नितीन सनगर, दर्शन जाधव, विनायक पावसकर, ओंकार फडके, राकेश होरंबे, डॉ. राज कवडे, अमित पोटफोडे, सुहास ठाकूरदेसाई, धीरज पाटकर, विशाल भोसले, योगेश मोरे, संदीप पावसकर, नारायण पाटोळे, गजानन भातडे, आरती दामले, मृणाल वाडेकर, रुद्र जाधव, सचिन नाचणकर, नीलेश शहा, ओंकार कांबळी, प्रा. बाबासाहेब सुतार, समीर धातकर, केदार देवस्थळी, प्रसाद हातखंबकर, श्रीलेश शिंदे यांच्यासह बालदोस्त आणि त्यांचे पालक उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply