बदलत्या पत्रकारिता क्षेत्रात आत्मचिंतनाची गरज : रत्नागिरीत पत्रकार भवनाच्या भूमिपूजनप्रसंगी पालकमंत्र्यांचे प्रतिपादन
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
बदलत्या पत्रकारिता क्षेत्रात आत्मचिंतनाची गरज : रत्नागिरीत पत्रकार भवनाच्या भूमिपूजनप्रसंगी पालकमंत्र्यांचे प्रतिपादन
मुंबई-गोवा महामार्गाचे काम १७ वर्षांपासून रखडले असून, ते लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे मराठी पत्रकार परिषदेकडून आंदोलन करण्यात आले.
मुंबई-गोवा महामार्गाचं एकंदर काम ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत पूर्ण झालं असून, रायगड जिल्ह्यातला माणगाव-इंदापूर भाग वगळता या महामार्गाचा प्रकल्प डिसेंबर २०२५पर्यंत पूर्ण होणार असल्याची ग्वाही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
आजच्या युगात सायबर संस्कार या सतराव्या संस्काराची गरज आहे, हे पटवून देणारा एक कार्यक्रम रत्नागिरीत अभियंता अक्षय फाटक यांनी अलीकडेच केला. मोबाइलमुळे फसवणुकीचे जे अनेक गुन्हे घडतात, त्याचे सविस्तर विश्लेषण त्यांनी केले. राजापूर तालुक्यातील एका गावाने याबाबतचे एक चांगले उदाहरण घालून दिले आहे. वयाची १८ वर्षे होईपर्यंत आपल्या मुलाला पालकांनी वैयक्तिक मोबाइल घेऊन देऊ नये, असा निर्णय या गावात घेण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शिवसेनेच्या चिन्हासह नेत्यांचे फोटो असलेल्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली की प्रचारावर बंधने येतात. पण त्याच्या आधीपासूनच उघडपणे प्रचार केला, तर उपयोग होतो, हे लक्षात घेऊन छत्र्यांचे वाटप करण्यात आले आहे. अशा प्रचारात कल्पकता नक्कीच आहे; पण शाळांमधून प्रचार करणे योग्य आहे का, याचा विचार करायला हवा. शिवाय मुलांना छत्र्या देण्यापेक्षा पुरेसे शिक्षक दिले, तर शिक्षणाचा दर्जा सुधारायला मदत होणार आहे. त्याची खरी गरज आहे.
रत्नागिरी तालुक्यातल्या वाटद-खंडाळा इथे प्रस्तावित असलेल्या एमआयडीसीला विरोध करण्यासाठी स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी आज (१९ जुलै) मोर्चा काढला होता. मोर्चानंतर खंडाळा इथे झालेल्या सभेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी मार्गदर्शन केलं.