महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाने २०२३ या २०२४ वर्षांचे विविध कृषी पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील सहा जणांचा समावेश आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाने २०२३ या २०२४ वर्षांचे विविध कृषी पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील सहा जणांचा समावेश आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. नंदकुमार तावडे यांचे १६ जानेवारी रोजी सायंकाळी गिम्हवणे येथील राहत्या घरी निधन झाले.
‘रत्नागिरीच्या हापूस आंब्याला आंतरराष्ट्रीय दर्जा आहे. त्याचप्रमाणे कोकणात काजू उत्पादनातूनही ब्राझीलप्रमाणे क्रांती होऊ शकते. नोकरीच्या तुलनेत शेतीतून दसपट अधिक पैसे मिळू शकतात; मात्र त्यासाठी आत्मपरीक्षण करून शेती वाढवली पाहिजे. शेतीत विविधता आणली पाहिजे. भात, नाचणीबरोबरच फळबागा लागवड क्षेत्र वाढवलं पाहिजे. कृषी प्रदर्शनाचा उपयोग करून घेऊन शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करावेत,’ असं आवाहन रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केलं.
रत्नागिरीत आज (१० मे) अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह आणि कृषी विकास परिषदेचं उद्घाटन झालं.
रत्नागिरी शहरातील स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात १० मे ते १२ मे या कालावधीत जिल्हास्तरीय कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह व कृषी विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन १० मे रोजी सकाळी १० वाजता राज्याचे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. यात एकूण १६५ दालने असतील आणि प्राधान्याने जिल्ह्यातील शेतकरी व बचतगट यांना मोफत दालने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
राजापूर : ओणी (ता. राजापूर) येथील सावली कृषी पर्यटन केंद्राचे संचालक डॉ. शैलेश सुभाषचंद्र शिंदे-देसाई यांना शेती प्रगती मासिकाचा कृषीभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.