दिवा-रत्नागिरी, कोकणकन्या एक्स्प्रेस रद्द

कोकण रेल्वे मार्गावरील आज, १५ जुलै रोजी धावणारी दिवा रत्नागिरी पॅसेंजर आणि रात्री सुटणारी मुंबई मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस विलंबाने धावणार

कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी स्थानकाजवळ दरड कोसळल्याने बंद झालेला मार्ग लवकर सुरू होण्याची शक्यता असून कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस विलंबाने का होईना, पण आज धावणार आहेत.

कोकणकन्या एक्स्प्रेसच्या दर्जात आणि क्रमांकात २० जानेवारीपासून बदल

नवी मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर दररोज धावणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेस या गाडीच्या दर्जामध्ये आणि क्रमांकातही येत्या २० जानेवारी २०२३ पासून बदल करण्यात येणार आहे. ही गाडी सुपरफास्ट एक्स्प्रेस म्हणून धावणार असून गाडीच्या सध्याच्या 10111/10112 या क्रमांकाऐवजी तो क्रमांक 20111/20112 असा होणार आहे.