राज्य नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रावर कढीपत्ता नाटक प्रथम

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रातून प्राथमिक फेरीत कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघाने सादर केलेल्या कढीपत्ता या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे.

कढीपत्ता नाटकातून उत्तम कौटुंबिक प्रबोधन

रत्नागिरी : जेवणातील कढीपत्त्याप्रमाणे आपल्या आई-वडिलांना आजकालच्या मुलांनी आपल्या जीवनातून बाजूला करू नये, असा संदेश देणारे कढीपत्ता नावाचे कौटुंबिक प्रबोधनात्मक नाटक राज्य नाट्य स्पर्धेत रत्नागिरी सादर करण्यात आले.

समाजव्यवस्था बिघडवणाऱ्यांना घडविलेली अद्दल

एकसष्टाव्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर सुरू असलेल्या प्राथमिक फेरीत आज (९ डिसेंबर २०२२) मेलो, डोळो मारून गेलो हे नाटक कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघ सादर करणार आहे. लोकशाही व्यवस्थेचा गैरवापर करून समाजव्यवस्था बिघडविणाऱ्या समाजकंटकांना लोकशाही कशी अद्दल घडवते आणि लोकशाही पुर्स्थापित होऊन समाजव्यवस्थेचा कसा विजय होतो, हे या नाटकात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.