ग्रामीण आवास योजनांमध्ये धामणसे आणि कोतवडे ग्रामपंचायतींना मिळाला प्रथम क्रमांक

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेमध्ये रत्नागिरी तालुक्यात सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतींच्या श्रेणीत धामणसे ग्रामपंचायतीने प्रथम, तर चवे आणि गोळप या ग्रामपंचायतींनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा पुरस्कार मिळवला. राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनेत कोतवडे ग्रामपंचायतीने पुन्हा एकदा पहिला क्रमांक मिळवला, तर गावखडी आणि निरुळ या ग्रामपंचायतींना दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळाला.

महाआवास अभियानाची उद्दिष्टपूर्ती रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी आव्हानाची

सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना अधिक गतिमान करण्यासाठी महाआवास अभियान-ग्रामीण २० नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानात दिलेल्या मुदतीत लक्ष्य पूर्ण करावे आणि हे अभियान अधिक प्रभावीपणे राबवावे, अशा सूचना कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी आज (२७ नोव्हेंबर) केल्या.